Just For Hearts

Lifestyle

बिन साखरेचा गोड Tea: शरीरासाठी आणि मनासाठी आरोग्यदायी सवय

Just For Hearts2 मिनिटांचे वाचन

बिन साखरेचा गोड Tea ☕ शरीरासाठी आणि मनासाठी!

सुरुवातीला थोडं वेगळं वाटेल, पण काही दिवसांनी लक्षात येईल की ही नवीन सवय म्हणजे शरीरासाठी गिफ्ट आणि मनासाठी नवा Ritual आहे!

का करावा सुरुवात? 1. साखरेऐवजी मसाल्यांचा गोडवा: Tea masala, विशेषतः cardamom (veldoda), आपल्या Tea ला नैसर्गिक गोडवा देतो. तसेच cinnamon, ginger, dry ginger, mace हे मसालेही चव खुलवतात. साखर न टाकता Tea ‘गोडस’ वाटतो!

2. साखरेचा आरोग्यावर परिणाम: दररोज 2 कप Tea × 2 चमचे साखर = वर्षभरात 3 किलो साखर! ही साखर शरीरात अतिरिक्त चरबी, रक्तातील साखरवाढ आणि Heart Disease चा धोका वाढवते.

3. खरं गोड काय? आरोग्य टिकवणं, थकवा कमी होणं, वजन आटोक्यात येणं. हाच खरा ‘गोड’ परिणाम.

4. सुरुवात कशी करावी? • आधी 1/2 चमचा साखर कमी करा • मग Tea masala वाढवा • हळूहळू पूर्णपणे साखर बंद करा

5. दूध की काढा? दोन्ही पर्याय उत्तम, फक्त साखर टाळा. मसाला काढा किंवा दूध घालून आले cardamom Tea.

6. घरचं Tea masala वापरा: साखर नसलेला मसाला वापरा. cardamom, dry ginger, cinnamon यांचे मिश्रण Tea गोडसर वाटू देतं.

7. काय लागते? • फक्त इच्छाशक्ती! • साखरेची जागा मसाल्यांनी भरली की चवसुद्धा छान वाटते.

8. खर्च? उलट साखरेचा खर्च वाचतो! आणि साखरेमुळे येणारे आजारही टळतात.

9. साइड इफेक्ट्स? काही नाही, फक्त सुरुवातीला चव बदललेली वाटते. 7–10 दिवसांत साखर विसरता येते!

10. दीर्घकालीन फायदे: • वजन नियंत्रण • Diabetes वर नियंत्रण • त्वचेसाठी फायदेशीर • मानसिक स्पष्टता • साखरेची लत्ताच बंद

❤️ ‘गोड’ हे नेहमी साखरेत नसतं... कधी कधी सवयीतही असतं! गोड मानून घ्यायला शिका स्वतःसाठी, आपल्या आरोग्यासाठी.

Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts

#sugar-free#tea#health#weight-control#diabetes#natural-spices
Share:WhatsAppXFacebook