Just For Hearts

Mental Wellness

सतत टेंशन? तुमचं Sympathetic System ओव्हरड्राईव्ह मध्ये आहे का?

Just For Hearts2 मिनिटांचे वाचन

सतत टेंशन?

लक्ष द्या तुमचं Sympathetic System 'ओव्हरड्राईव्ह' वर तर नाही ना?

ताण, स्पीड, सततची तयारी ही अवस्था शरीरासाठी फायदेशीर असते… थोडावेळ.

पण जर तीच 'सावधान' अवस्था 24x7 सुरू राहिली, तर? त्यालाच म्हणतात Sympathetic Overdrive.

ही अवस्था विचारांच्या गोंधळात न समजता अनेक आजारांची सुरुवात ठरते.

1. उच्च रक्तदाब (High BP) - एक सततचा अलार्म! सतत तयार राहणं, धडधडणं, चिडचिड यामुळे शरीरात BP कायम जास्त राहतो. हेच पुढे जाऊन हृदयविकार, स्ट्रोक याचा धोका वाढवते.

2. झोपेचा अपुरा दर्जा (Poor Sleep Quality) Sympathetic Overdrive मुळे मेंदू 'शांत' होत नाही. सततच काहीतरी विचार… आणि मग झोपेचं खोबरं!

3. वजन न वाढणं, किंवा उलट वाढत जाणं अनेकजण म्हणतात: “स्ट्रेस मध्ये आहे, तरीही खूप खातो/खात नाही.” हा hormonal imbalance cortisol आणि sugar craving मुळे होतो.

4. Anxiety, Panic, Irritability, लपलेलं मानसिक थकवा डोकं शांत नसणं म्हणजे मन थकलेलं असतं पण ते फार वेळेपर्यंत न समजता राहतं. मग panic attacks, mood swings यांना निमंत्रण मिळतं.

5. Diabetes + Heart Disease - Sympathetic Overdrive हा linking factor! Sugar spike, insulin resistance, BP elevation या सगळ्याचा केंद्रबिंदू हा sympathetic overdrive असतो, हे नोंद घ्या.

कसं ओळखाल? • Resting heart rate सतत जास्त (80+ bpm?) • झोप लागायला वेळ लागतो, रात्री जाग येते? • Relaxing करूनही मन शांत वाटत नाही? • BP fluctuations? • Digestive issues (पचन नीट न होणं)?

काय करू शकतो? • रोजचं 20-30 मिनिटांचं चालणं / प्राणायाम • Breathing exercises – विशेषतः 4-7-8 Breathing • Screen detox एकतरी वेळ फोन दूर ठेवा • शक्य तिथे 'Slow Down' चा सराव • गरज लागल्यास मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला

जसं गाडीचा accelerator सतत दाबला तर ब्रेक फेल होतो, तसंच शरीरातला sympathetic system overload झाला की शरीर कोसळतं.

आजचा दिवस हा विचार करण्यासाठी एक छोटा ब्रेक घ्या. तुमचं nervous system रिचार्ज करा, ते तुमच्या संपूर्ण आरोग्याचं बॅकबोन आहे!

Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts

#sympathetic-overdrive#stress#mental-health#blood-pressure#sleep#anxiety#heart-disease
Share:WhatsAppXFacebook