Lifestyle
Tiny Habits : छोट्या सवयींचा मोठा परिणाम (B.J. Fogg यांच्या पुस्तकातून शिकलेले)
Tiny Habits : छोट्या सवयींचा मोठा परिणाम (B.J. Fogg यांच्या पुस्तकातून शिकलेले)
आपण सवयी बदलताना बहुतेक जण मोठ्या गोष्टींनी सुरुवात करतो जसे जिम, कडक डाएट, मोठे रूटीन… पण B.J. Fogg म्हणतात – “Emotions create habits, not motivation.” म्हणजे सुरुवात लहान, आनंददायी, सहज असावी.
या book मधून Patients तसेच निरोगी व्यक्तींसाठी मला आवडलेले काही मुद्दे (lessons):
1. Anchor : नवी सवय आधीच असलेल्या गोष्टीशी जोडा. उदा. दात घासल्यावर १ ग्लास पाणी पिणं.
2. Start small : रोज १ पुश-अप करा आणि हळूहळू वाढवा. मोठं लक्ष्य पहिल्या दिवशीच नाही.
3. Celebrate : लहान यश साजरं करा. हसणं, थोडं टाळ्या वाजवणं इत्यादी, मेंदू त्या सवयीला reward मानतो.
4. Emotions > Motivation : मोटिव्हेशनवर विसंबू नका. आनंदाने केल्यास सवय टिकते.
5. Compounding Effect : लहान बदल रोज केल्यास महिन्यांनी मोठा फरक पडतो. जेवणानंतर ३ मिनिटं चालणं → वर्षभरात साखर व वजन दोन्ही नियंत्रणात राहतात.
माझे मत: रुग्ण असो किंवा निरोगी व्यक्ती – “Small is powerful” हे लक्षात ठेवा. लहान, सुलभ, आनंददायी बदल केल्यास दीर्घकालीन आरोग्य सुधारणा नक्की होते.
आज एक छोटी सवय सुरू करा. ५ वर्षांनी त्याचा फायदा कल्पनेपलीकडे असेल.
पुढील काही दिवसांत मी या प्रत्येक मुद्द्याचं अधिक स्पष्टीकरण आणि उदाहरणांसह पोस्ट्स शेअर करणार आहे, जे तुम्ही लगेच वापरू शकता.
Dr Ravindra L Kulkarni MD DNB FSCAI Cardiology Just For Hearts