General Health
जीभेवर पांढरट थर – कारणे आणि उपाय
जीभेवर पांढरट थर – कारणे आणि उपाय
1. उशिराचं जेवण, अपचन, फास्ट फूड – जेव्हा पचन मंदावते, तेव्हा जीभ कोट होते. 2. झोप कमी, पाणी कमी, तोंड कोरडं – शरीर थकलं की जीभ लगेच संकेत देते. 3. थंडीत किंवा तापात तोंड सुजतं किंवा चव जाते – यामुळे तात्पुरता थर दिसू शकतो. 4. फंगल इन्फेक्शन (Oral Candidiasis) – थर, जळजळ आणि चव गेली का? विशेषतः Diabetes किंवा antibiotics घेतल्यावर शक्यता जास्त. 5. काही औषधं (BP, depression) – side effects म्हणून तोंड कोरडं आणि थर होतो. 6. तंबाखू, गुटखा, धूम्रपान – कायमस्वरूपी थर तयार होतो आणि धोका वाढतो. 7. रोज tongue cleaner न वापरणं – फक्त ब्रश पुरेसा नाही, जीभही रोज स्वच्छ केली पाहिजे. 8. फक्त थर आहे म्हणून कॅन्सर नाही होत! पण वारंवार होत असेल, वास येत असेल तर लक्ष द्या. 9. उपचार कारणानुसार ठरतात: – अपचन → Digestive औषधं – फंगल → Clotrimazole/Fluconazole – कोरडं तोंड → पाणी, सलाइन स्प्रे 10. “थर म्हणजे उष्णता” हे सरधोपट समजुतीत नका अडकू – योग्य निदानाशिवाय वेळ आणि पैसा वाया जातो.
थर दिसतोय? घाबरू नका. कारण समजून घ्या आणि उपाय करा.
डॉ. रवींद्र एल. कुलकर्णी Just For Hearts