Just For Hearts

General Health

Cancer हा फक्त वयोवृद्धांचा आजार नाही: भारतातील प्रमुख प्रकार आणि वयोगट

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

Cancer हा फक्त वयोवृद्धांचा आजार नाही; तुमच्या मित्रपरिवारातील कुणीतरी या यादीत असू शकतो. भारतामध्ये आढळणारे 10 प्रमुख Cancer, कोणत्या वयोगटात आणि कोणत्या लिंगात जास्त दिसतात ते समजून घ्या:

1. Breast Cancer स्त्रिया | वय: 35–60 वर्षे महिलांमध्ये सर्वाधिक सामान्य. स्तनात गाठी, वेदना, त्वचेतील बदल याकडे दुर्लक्ष करू नका.

2. Lung Cancer पुरुष + स्त्रिया | वय: 40–70 वर्षे धूम्रपान, प्रदूषण, passively धूर घेतल्याने धोका वाढतो.

3. Oral Cancer पुरुष > स्त्रिया | वय: 30–60 वर्षे तंबाखू, गुटखा, सुपारी, दातांमध्ये वारंवार दुखणे हे संकेत आहेत.

4. Cervical Cancer स्त्रिया | वय: 30–55 वर्षे HPV virus, स्वच्छतेचा अभाव, जागरूकतेचा अभाव. योग्य तपासणी आणि लसीकरण आवश्यक.

5. Colorectal Cancer दोघांमध्ये | वय: 45–70 वर्षे पोट साफ न होणे, वजन कमी होणे, मलात रक्त याकडे लक्ष द्या.

6. Prostate Cancer पुरुष | वय: 55–75 वर्षे मूत्रविसर्जनात अडथळा, वारंवार मूत्र लागणे; वेळेत तपासणी महत्वाची.

7. Liver Cancer दोघांत | वय: 40–65 वर्षे हेपेटायटिस, दारू, fatty liver या कारणांमुळे धोका वाढतो.

8. Blood Cancer (Leukemia) लहान मुले + तरुण | वय: 5–25 वर्षे रक्तातील दोष, वारंवार ताप, अशक्तपणा, platelets कमी; लवकर निदान गरजेचे.

9. Skin Cancer दोघांमध्ये | वय: 30–70 वर्षे सतत सूर्यात काम करणाऱ्यांमध्ये धोका जास्त.

10. Thyroid Cancer स्त्रिया > पुरुष | वय: 25–45 वर्षे मान पुढे सुजणे, गळ्याचा आकार बदलणे हे इशारे असू शकतात.

लक्षात ठेवा: Cancer ही ‘last stage’ ची शिक्षा नाही. वेळेत निदान आणि योग्य उपचारांमुळे बरे होण्याची शक्यता मोठी असते.

ही माहिती शेअर करा आणि जागरूकता वाढवा.

Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts

#cancer-awareness#cancer-prevention#health#india#breast-cancer#lung-cancer#oral-cancer#cervical-cancer
Share:WhatsAppXFacebook