Just For Hearts

Blood Pressure

30 वर्षांचा IT Professional: Blood Pressure नव्हे, भीतीवर उपचार

Just For Hearts2 मिनिटांचे वाचन

OPD मध्ये 30 वर्षांचा एक IT Professional दुसऱ्या मतासाठी (Second opinion) आला होता. त्याला Metabolic syndrome आणि Vitamin B12 deficiency चे निदान झाले होते. त्याचा History आणि सध्याचे Treatment पाहताना लक्षात आले की तो 3-4 वर्षांपासून combination Blood Pressure medicines घेत होता. आज त्याचा Blood Pressure 120/80 होता, व्यवस्थित होता. काही दिवसांपासून तो normal असूनही Dose तोच होता.

Lifestyle बद्दल विचारले असता… चालणं? ❌ Post-meal walk? ❌ Sunlight? ❌ Stress handling? ❌ फक्त औषधं आणि भीती.

एका Prescription च्या शेवटी एक ओळ होती: “जर Blood Pressure 130/90 झाला तर तुमच्या nearby doctor ने मला call करावा.”

ते वाचून मला एक गोष्ट ठळकपणे जाणवली: - इथे Blood Pressure treat होत नव्हता. - इथे भीती treat होत होती… Medicines नी.

30 वर्षांचा तरुण, Blood Pressure थोडा जरी वाढला तरी घाबरतो. कारण त्याच्या डोक्यात एक गोष्ट ठसवली गेली होती की “Blood Pressure नेहमी 120/80 हवाच.”

Lifestyle कधी चर्चेतच आला नाही. Dose कमी करण्याचा विचार नाही. Observation नाही, Patience नाही. फक्त Fear + Medicine = Treatment.

आणि त्या ओळीचा अर्थ काय? “GP ने call करावा.” म्हणजे काय? General Practitioner हा फक्त messenger आहे का? तो Patient पाहतो, follow-up घेतो, पण निर्णय घ्यायचा अधिकार नाही? Senior नाव म्हणजे सगळे प्रश्न एका phone call मध्ये सुटतात का?

हे clinical management नाही. हे hierarchy-driven medicine आहे. आणि ते धोकादायक आहे.

आजचे Science स्पष्ट आहे. AHA / ESC / ESH सांगतात की early stage मध्ये, borderline Blood Pressure / metabolic issues असतील, तर आधी Lifestyle modifications वर भर द्या. Observation नुसार Dose titration करा. आणि अनेक वेळा Medicine कमी होऊ शकते, कधी थांबूही शकते.

पण इथे Lifestyle नाही. Fear आहे. आणि safety म्हणजे फक्त Medicine च असे समीकरण.

आज मला Blood Pressure वाढलेला Patient दिसला नाही. मला Fear वाढलेला Patient दिसला. आणि हे दुर्दैवाने… खूप common आहे.

Dr. Ravindra L Kulkarni MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts

#young-hypertension#fear-driven-medicine#lifestyle-modifications#metabolic-syndrome#primary-care#blood-pressure-management#dose-titration#cardiology
Share:WhatsAppXFacebook