Lifestyle
Metabolism बिघडवणारे दोन महत्त्वाचे Hormones
Metabolism बिघडवणारे दोन महत्त्वाचे Hormones म्हणजे Insulin आणि Cortisol.
OPD मध्ये अनेकदा काही तक्रारी ऐकू येतात जसे की:
- सकाळी उठल्यावर थकवा - झोप पूर्ण झाल्यासारखी वाटत नाही - पोटाभोवती चरबी वाढणं - sugar borderline - BP कधी कधी वाढणं
हे वेगवेगळं वाटतं, पण कधी कधी मागे असते body ची stress response system.
1. Cortisol म्हणजे काय?
Cortisol हा adrenal glands मध्ये तयार होणारा hormone आहे. त्याचं काम: - stress handle करायला मदत करणे - शरीराला ऊर्जा उपलब्ध करून देणं - blood pressure आणि sugar balance मध्ये भूमिका बजावणं
म्हणजे cortisol हा शरीराचा natural stress hormone आहे.
2. Cortisol चा natural rhythm
Cortisol दिवसभर समान नसतो. साधारण pattern: - सकाळी जास्त → शरीर जागं करतो - दुपारी हळूहळू कमी - रात्री सर्वात कमी → झोपेसाठी तयारी
हा शरीराचा circadian rhythm आहे.
3. हा rhythm बिघडला तर काय होतं?
आज अनेक गोष्टी cortisol चा rhythm बिघडवतात जसे की: - उशिरापर्यंत स्क्रीन वापरणे - कमी झोप - सतत मानसिक ताण - physical activity कमी - अनियमित routine
म्हणून शरीर सतत alert mode मध्ये राहतं.
4. Cortisol जास्त राहिला तर
दीर्घकाळ cortisol वाढल्यास metabolism वर परिणाम दिसू शकतो जसे की: - पोटाभोवती fat वाढणं - sugar control बिघडणं - BP वाढणं - झोप हलकी होणं - fatigue
5. Steroid औषधांमधून Cortisol समजतो
Steroid औषधं अनेकदा corticosteroid group मधील असतात. त्यांची क्रिया शरीरातील cortisol सारखीच असते. दीर्घकाळ steroid therapy घेतल्यावर काही metabolic बदल दिसू शकतात जसे की: - weight वाढणं - sugar वाढणं - BP वाढणं
यातून cortisol चा प्रभाव समजतो.
6. Cortisol कसं तपासतात?
गरज पडल्यास cortisol तपासता येतो: - सकाळचा blood cortisol test - काही वेळा saliva किंवा urine test
पण रोजच्या stress मध्ये lifestyle pattern जास्त महत्त्वाचा असतो.
7. Cortisol rhythm सुधारण्यासाठी साधे उपाय
- सकाळी सूर्यप्रकाश घेणं - नियमित चालणं / activity करणं - संध्याकाळी शांत वेळ देणं - झोपेची वेळ निश्चित करणं
हे छोटे बदल body clock पुन्हा संतुलित करायला मदत करतात.
समजून घ्या की metabolism बिघडवणारे दोन hormones अनेकदा एकत्र दिसतात: Insulin आणि Cortisol. एक अन्नाशी संबंधित, दुसरा stress शी. दोघांचा rhythm बिघडला की शरीराचा rhythm बिघडतो.
Dr Ravindra L Kulkarni MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts