Heart Health
दोन मिनिटांची भेट आणि मनातील पोकळी
वृद्ध दांपत्य डॉक्टरांना भेटण्यासाठी अनेक दिवसांपासून तयारी करतात. ते मर्यादित कपड्यांतून एक चांगला ड्रेस निवडतात, रिपोर्ट्स नीट दुमडून ठेवतात, बस-रिक्षाचा विचार करतात.
भेटीच्या दिवशी लवकर उठून तयार होतात, प्रवास करतात आणि क्लिनिकला पोहोचतात.
बहुतेक वेळा मुलं सोबत नसतात. Reception वर हसून बोलणारा कुणी नसतो. चहा-कॉफी तर दूर, greetings किंवा सामान्य शिष्टाचारही नसतो – तेही NABH accredited hospital मध्ये.
ते शांतपणे आपला नंबर येण्याची वाट बघतात, कारण ही भेट त्यांच्या आयुष्यातील मोठा क्षण असतो. त्यांना अपेक्षा असते की कुणीतरी त्यांचं ऐकेल, आश्वासन देईल.
पण कॅबिनमध्ये गेल्यावर... डॉक्टर hardly दोन-तीन मिनिटं बोलतात, Pulse BP ठीक आहे, जुनीचं औषध चालू ठेवा… prescription assistant कडून मिळेल, next! संपूर्ण भेट काही मिनिटांतच संपते.
बाहेर येताना त्यांच्या चेहऱ्यावरचं आश्वासनाचं हास्य हरवतं. ते शांतपणे रिपोर्ट्स आवरतात, एकमेकांकडे पाहतात – “इतकी तयारी करून आलो, पण आमचं ऐकलं तरी कुणी?” डोळ्यांत निराशा, खिन्नता आणि किंचित अपमानाची भावना स्पष्ट दिसते.
घरी परतल्यावर पुन्हा तीच एकसुरी, एकाकी दिनचर्या सुरू होते – पण मनात एकच विचार: “आपण खरंच महत्त्वाचे आहोत का… की फक्त prescription book मधली entry?”
सर्वांसाठी विचार करण्यासारखे प्रश्न:
• अशा जलद आणि कमी संवाद असलेल्या भेटी रुग्णांच्या अपेक्षांना खरंच पूर्ण करतात का? • तुम्ही कधी तुमच्या आई-वडिलांसोबत specialist कडे गेलात का? त्यांच्या चेहऱ्यावरचं भाव पाहिलं आहे का? • रुग्णासाठी उपचार हीच भेट आहे का, की संवाद, समजून घेणं आणि आदरही तितकेच महत्त्वाचे आहेत? • आपल्या आरोग्य व्यवस्थेत आपण हे किती गंभीरपणे घेतो?
Dr Ravindra L Kulkarni MD DNB FSCAI Cardiology Just For Hearts