Just For Hearts

Heart Health

Coronary Blockage किती % आहे हे समजून घेणे: फक्त टक्केवारी महत्त्वाची नाही

Just For Hearts2 मिनिटांचे वाचन

"Doctor, blockage किती % आहे?" हा प्रश्न आजच्या काळातील सर्वात चुकीचा प्रश्न आहे.

Blockage म्हणजे किती % आहे यापेक्षा plaque कसा आहे हे जास्त महत्त्वाचं आहे.

आपण "blockage" म्हणतो ते खरं तर रक्तवाहिनी बंद होणं नाही. त्यामागे सूज, fat, inflammation आणि clot तयार होण्याची tendency काम करत असते.

1) Blockage म्हणजे narrow झालेली coronary artery. पण कारण फक्त cholesterol नसतं.

Plaque म्हणजे fat + cholesterol + calcium + inflammation याचं मिश्रण.

2) फक्त % पाहून risk ठरत नाही.

Angiography मध्ये 40% दिसतं, पण plaque soft असेल तर फुटण्याची शक्यता जास्त. Soft plaque rupture → sudden clot → full blockage.

3) मग 70–80% blockage असूनही लोक वर्षानुवर्षे ठिक कसे राहतात?

कारण ते plaque stable असतात. Thick fibrous cap + calcium = कमी rupture risk. Flow थोडा कमी पण sudden attack चा risk कमी.

4) 30–40% blockage वरही attack कसा येतो?

कारण attack “% block” मुळे नाही, plaque फुटून sudden clot बनल्यामुळे होतो. Clot seconds मध्ये 30% → 100% block करतो.

5) Blockage चे type समजले तर निर्णय सोपा: - Soft plaque → जास्त धोकादायक - Calcified plaque → कमी धोकादायक, पण narrowing जास्त - Thrombus → sudden clot, emergency - Total occlusion → 100% block, urgent stent/bypass

6) Angiography फक्त दिसणारं सांगतं. Depth नाही.

% blockage, length दिसतं. पण plaque चा स्वभाव, softness, clot, calcium… हे दिसत नाही.

7) म्हणून आज IVUS/OCT खूप महत्त्वाचं.

IVUS (Intravascular Ultrasound) आणि OCT plaque चं microscopic detail दाखवतं. Soft आहे की hard? rupture risk आहे का? clot आहे का? Decision scientifically clear होतो.

8) Angioplasty कधी करावी? सोपं, safety-first उत्तर: • Severe symptoms • Stress test positive • Weak blood flow • IVUS/OCT मध्ये high-risk soft plaque • Thrombus / unstable plaque या वेळी stent जीवन वाचवू शकतो.

9) Calcium असला तर stent लावणं सोपं नसतं.

Calcium deposits balloon ने easily उघडत नाहीत. अशावेळी rotablation किंवा Shockwave IVL लागते ही advanced तयारी असणं गरजेचं.

10) आजच्या तरुणांमध्ये heart attacks वाढलेत कारण plaque rupture ची tendency वाढलीये.

Post आवडली तर like, share तसेच WhatsApp forward करायला विसरू नका.

Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts

#heart-attack#blockage#coronary-artery-disease#plaque-rupture#thrombosis#ivus#oct#angioplasty
Share:WhatsAppXFacebook