General Health
डेंग्यू ताप समजून घ्या: घाबरायचं नाही, माहिती घ्या
डेंग्यू ताप समजून घेणे:
1. सगळ्यांना डेंग्यूमुळे admit करायची गरज नाही. • 80% रुग्णांचा ताप स्वतःहून बरा होतो.
2. फक्त ताप आणि platelets कमी असणे म्हणजे Hospital जाण्याची गरज नाही. • रिपोर्ट्सपेक्षा पेशंटची clinical लक्षणं अधिक महत्त्वाची असतात.
3. Platelets 20,000 पेक्षा कमी असतील आणि रक्तस्राव असेल तरच transfusion आवश्यक. • फक्त platelets number वर transfusion देणे म्हणजे खर्च आणि धोका वाढवणे.
4. पहिल्या 3-4 दिवसांत ताप 104°F च्या आसपास जातो, नंतर अचानक उतरतो, पण त्यानंतर platelets कमी होतात.
5. सगळ्यात धोका असतो 'critical phase' म्हणजे ताप उतरल्यावरचे 24-48 तास. • हा observation, hydration आणि योग्य सल्ल्याचा काळ असतो.
6. डेंग्यूमध्ये excessive IV fluids देणे धोकादायक ठरू शकते. • शरीराला फक्त आवश्यक तेवढाच द्रव द्यावा, नाहीतर lungs मध्ये द्रव साचू शकतो.
7. डेंग्यूमध्ये फक्त platelets वर लक्ष न देता bleeding, Blood Pressure, alertness, उलटी, पोटदुखी याकडे लक्ष द्यावे.
8. अनेक रुग्णांना panic मुळे अनावश्यक hospitals, महागडे ICU आणि transfusion therapy घ्यावी लागते, जे टाळता येऊ शकते.
या आजाराबाबत patients आणि relatives यांना अनेक प्रश्न असतात.
तुमचे प्रश्न असतील तर like करा, repost करा आणि मग विचारा; नक्की उत्तर मिळेल.
डेंग्यू बाबत अधिक posts साठी @KulkarniRL ला follow करा.
डॉ. रवींद्र एल कुलकर्णी Just For Hearts