Just For Hearts

General Health

Metabolism म्हणजे काय? एका वाचकाचा प्रश्न

Just For Hearts2 मिनिटांचे वाचन

एक वाचक अगदी प्रामाणिकपणे म्हणाले, "सर, तुम्ही सोपं लिहिता… पण Metabolism म्हणजे काय हेच कळत नाही."

त्यांचा point बरोबर आहे, काही शब्द सोपे नसतात, समजणं महत्त्वाचं असतं.

चला, Metabolism अगदी सोप्या शब्दांत समजून घेऊया.

Metabolism म्हणजे शरीराचं “आतलं कामकाज”.

तुम्ही जे खाता, ते शरीर: - Energy बनवतं - साठवून ठेवतं - वेळ आली की वापरतं

ही सगळी प्रक्रिया म्हणजे Metabolism.

उदाहरण: तुमचं शरीर म्हणजे एक घर समजा. • अन्न = घरात येणारा सामान • पचन = सामान उघडणं • Metabolism = 👉 काय लगेच वापरायचं 👉 काय साठवायचं 👉 काय टाकून द्यायचं

जर हे सगळं नीट झालं तर शरीर हलकं, Energy चांगली. जर बिघडलं तर Fat साठतो, Sugar वाढते, Cholesterol वाढतं.

सध्या सगळीकडे Metabolism ची चर्चा सुरू आहे कारण आज बहुतेक आजार एकाच ठिकाणी येऊन थांबतात: Metabolism.

- Diabetes - Fatty Liver - Obesity - High Cholesterol - BP - Heart Disease

हे वेगळे आजार वाटतात, पण मुळात सगळे Metabolic बिघाडाचे परिणाम आहेत.

पुढच्या काही वर्षांत trend काय असणार? Medicines वाढणार नाहीत… Lifestyle वर जास्त भर येणार आहे. • आपण कसं खातो • किती वेळ बसतो • किती हलतो • झोप कशी आहे

यावर Treatment ठरणार आहे. म्हणजेच Metabolism समजणं ही पुढच्या काळात basic गरज ठरणार आहे.

माझा 25+ वर्षांचा अनुभव काय सांगतो? जे रुग्ण “Report” पेक्षा शरीर कसं काम करतं हे समजून घेतात, त्यांचा Control जास्त टिकाऊ असतो.

आता स्पष्ट आहे, Metabolism म्हणजे: - Diet नाही - Exercise नाही - औषध नाही Metabolism = शरीर रोज कसं वागतं ते.

अजून कोणता शब्द, संकल्पना समजायला कठीण वाटते? कॉमेंटमध्ये विचारा. Next पोस्टमध्ये त्यावर बोलूया.

चर्चा झाली की समज वाढते. समज वाढली की आरोग्य बदलतं.

Dr Ravindra L Kulkarni MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts

#metabolism#health#lifestyle#diabetes#obesity#heart-disease#energy#fat-storage
Share:WhatsAppXFacebook