General Health
फक्त ताप वाटतोय… पण तो तुमचा Health बिघडवू शकतो!
"फक्त ताप वाटतोय… पण तो सगळं बिघडवतोय!"
आजूबाजूला सर्दी, ताप, अंगदुखी, खोकला, थकवा असलेल्या अनेक रुग्णांचं प्रमाण वाढलंय.
कधी कधी साधा ताप 8-10 दिवस टिकतो, पण लवकर ठीक होत नाही.
8 महत्वाच्या गोष्टी समजून घ्या, घाबरू नका:
1. लक्षणं कशी असतात? ताप, अंग दुखणं, डोकेदुखी, घाम, थकवा, घसा बसणे, खोकला – सुरुवातीला सगळं सामान्य वाटतं.
2. कधी तपासण्या गरजेच्या? - ताप ३ दिवसांहून जास्त टिकतो - थकवा किंवा घाम खूप येतो - प्लेटलेट्स तपासणं (डेंग्यू, व्हायरल), CBC, CRP, मलेरिया यांचे reports उपयोगी
3. कधी ऍडमिट करावं? - ताप अत्यंत जास्त (104°F+) - उलट्या, भूक बंद, प्लेटलेट्स खूप कमी - BP कमी होणं, confusion
4. घरी काय काळजी घ्यावी? - भरपूर पाणी आणि इलेक्ट्रोलाइट - शरीराला विश्रांती लागते - सर्दी-तापामध्ये स्टीम, गार्गल्स, आवश्यक तेवढी औषधं
5. डायट कसं असावं? - पातळ, सुपाचं जेवण - थोडं थोडं पण वारंवार - पचायला हलकं अन्न - फळांचा रस, नारळपाणी, ताक
6. थकवा का राहतो? शरीराच्या लढाईनंतर पूर्ण बरे होण्यासाठी 1-2 आठवडे लागू शकतात. अनेकांना खोकला, थकवा, irritability लांबणं हे सध्याचं सामान्य pattern आहे.
7. खोकला का राहतोय? घशाचा dryness, allergies, किंवा viral inflammation मुळे खोकला 10-15 दिवस टिकतो. योग्य स्टीम, गरम पाणी मदतीला येते.
8. कधी डॉक्टरांना त्वरित दाखवा? - श्वास घेण्यास त्रास - सतत झोपून राहणं - चक्कर येणं - भूक पूर्ण बंद होणं
हे व्हायरल आहे… पण घाबरायचं नाही.
आपण लक्ष देऊन योग्य काळजी घेतली, तर घरातच बरे होता येतं.
पण हलगर्जीपणा महागात पडतो.
हा संदेश आपल्या वॉट्सअॅप कॉलनी/फॅमिली ग्रुपमध्ये शेअर करा. आजार आल्यावर माहिती उपयोगी पडते, पण आधी मिळालेली माहिती जीव वाचवते.
Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts