Just For Hearts

Heart Health

हृदयविकारानंतर चालणे: आरोग्याकडे एक नवा श्वास

Just For Hearts2 मिनिटांचे वाचन

हृदयविकारानंतर चालणे म्हणजे आरोग्याकडे एक नवा श्वास!

Cardiac Rehab एका साध्या पावलाने सुरू होते, पण योग्य मार्गदर्शनाशिवाय ते धोकादायक ठरू शकते.

1. "कधी चालायला सुरुवात करावी?" जितकं लवकर, तितकं चांगलं (पण योग्य मार्गदर्शनात)!

हॉस्पिटलमधून सुटल्यावर 3–5 दिवसांत चालणं सुरू करावं (AHA, 2023). सुरुवात फक्त खोलीत किंवा कॉरिडॉरमध्ये 5 मिनिटांपासून दम न लागेपर्यंत करा.

2. "किती चालावं?" Quality > Quantity पहिल्या आठवड्यात दिवसातून 2 वेळा 5–7 मिनिटं चालावीत. दुसऱ्या आठवड्यापासून हळूहळू 15–20 मिनिटांपर्यंत वाढवा.

तुमच्या शरीराला ऐका, ठराविक वेळेच्या आधारे चालण्यापेक्षा थकल्यास थांबा.

3. "कधी चालावं?" योग्य वेळ निवडा आणि अनावश्यक धोक्यांपासून बचाव करा. सकाळी 7–9 आणि संध्याकाळी 5–7 ही सर्वोत्तम वेळ आहे. जेवणानंतर 1.5 तासाचं अंतर ठेवा.

उन्हात, प्रदूषणात किंवा दम लागणाऱ्या हवामानात चालणं टाळा.

4. "औषधे चालू असताना चालता येईल का?" – नक्कीच, पण खबरदारी बाळगा. Beta blockers घेतल्यावर Heart rate कमी होतो, पण घाबरायचं नाही. Antiplatelets, Statins किंवा Diabetes चे औषधं चालू असतानाही चालणं शक्य आहे.

पण प्रत्येक टप्प्यावर डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे. One-size-fits-all चालत नाही.

5. "चालण्याचा ट्रॅकिंग" तुम्ही किती सुधारत आहात हे जाणून घेण्यासाठी! Google Fit, Apple Health किंवा साधी डायरी वापरून दररोजच्या चालण्याची नोंद ठेवा. वेळ, अंतर, दम लागण्याचा अनुभव हे सगळं पुढील follow-up मध्ये डॉक्टरांसाठी महत्त्वाचं ठरतं.

तुम्ही हृदयविकारानंतर चालायला केव्हा सुरुवात केली? कोणत्या अडचणी आल्या? तुमचे प्रश्न, अनुभव किंवा भीती खाली कमेंटमध्ये शेअर करा.

हा पोस्ट शेअर करा, तुमचा मित्र, नातेवाईक किंवा वडीलधारी व्यक्ती आजपासून चालायला सुरुवात करू शकतात. "हृदय वाचवण्याची सुरुवात तुमच्याच शेअरने होईल!"

जर तुम्ही नव्याने जोडले असाल, तर टाइमलाइन नक्की पाहा, बरेच महत्वाचे विषय आधीच चर्चेत आले आहेत! वाचायला, लाइक करायला आणि शेअर करायला विसरू नका!

Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts

#cardiac-rehab#heart-attack-recovery#walking#heart-health#post-heart-attack#exercise#medication#health-tracking
Share:WhatsAppXFacebook