Diabetes
Sugar Spikes म्हणजे नक्की काय?
Sugar Spikes म्हणजे नक्की काय आणि त्या का टाळल्या पाहिजेत?
Sugar Spikes म्हणजे जेवणानंतर रक्तातील साखर अचानक वाढणे. हे Pre-diabetes, Insulin Resistance, आणि Type 2 Diabetes असलेल्या रुग्णांमध्ये अतिशय सामान्य आहे.
वैज्ञानिक कारणं:
1. High Glycemic Index (GI) अन्न - पांढरी भात, ब्रेड, साखरयुक्त पेये यामुळे glucose absorption वेगाने होते. 2. Low fiber meals - Fiber कमी असल्यास sugar थेट absorb होते. 3. Physical inactivity - जेवणानंतर हालचाल न केल्यास glucose वापरात येत नाही. 4. Stress & poor sleep - Cortisol वाढल्यामुळे sugar control बिघडतो. 5. Skipped meals - मोठा gap घेतल्यावर अचानक मोठं जेवण = अधिक spike.
लक्षणं: - जेवणानंतर झोप येणं, जडपणा - डोळ्यांतील धूसरपणा - थकवा, चिडचिड, mood swings - जास्त भूक, cravings - वारंवार लघवी / तोंड कोरडं - Finger prick reading > 180 mg/dL (2 तासांनी)
सततच्या spikes ने Neuropathy, Retinopathy, Kidney damage लवकर सुरू होतात तसेच ह्रदयविकाराचा धोका पण वाढतो.
Sugar Spikes कमी करण्याचे उपाय:
- Plate मध्ये salad, fiber, protein आधी खा, absorption हळू होतो. - जेवणानंतर 10–15 मिनिटे चालणं, glucose वापरले जाते. - Stress control - meditation, चांगली झोप. - साखर, packaged juice, sweetened tea/coffee टाळा. - पाणी प्या - hydration maintains kidney filtration. - Routine tracking - CGM, post-meal sugars तपासा.
तुम्हाला तुमच्या जेवणानंतर sugar spike होतं का? काय जाणवते? तुम्ही काही उपाय केले का?
तुमचे अनुभव, प्रश्न आणि उपाय comments मध्ये नक्की share करा!
Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts