Lifestyle
थायरॉईड म्हणजे नेमकं काय असतं?
थायरॉईड म्हणजे नेमकं काय?
हे समजणं फार महत्त्वाचं आहे जेणेकरून औषधं वेळेवर घेतली जाऊ शकतील!
1. थायरॉईड ग्रंथी म्हणजे काय? ही मानेत असलेली ग्रंथी आहे जी "Thyroxine" हार्मोन तयार करते. हार्मोन कमी झाल्यास Hypothyroid आणि जास्त झाल्यास Hyperthyroid म्हणतात. ही समस्या 30–55 वयोगटातील महिलांमध्ये जास्त दिसते.
2. Hypothyroid ची लक्षणं: सतत थकवा, वजन वाढणं, केस गळणं, थंडी जास्त जाणवणं, मूड कमी होणं, पचन बिघडणं, मासिक पाळी अनियमित होणं आणि गर्भधारणेत अडचण. अनेकदा दुर्लक्षित होते!
3. कोणत्या टेस्ट कराव्यात आणि किती वेळा? TSH ही मुख्य टेस्ट आहे, तसेच गरजेनुसार T3, T4, Anti-TPO टेस्ट करतात. निदानानंतर 3–6 महिन्यांनी आणि नंतर 6–12 महिन्यांनी तपासणी करणे आवश्यक आहे.
4. औषधं कशासाठी आणि किती काळ? Thyroxine शरीरातील कमकुवत हार्मोन भरून काढते. रोज सकाळी उपाशीपोटी 30–60 मिनिटे काही न घेता घ्यावी. डोस वय, वजन आणि तपासणीवर अवलंबून ठरतो - 25/50/100 mcg. अनेकांना दीर्घकाळ किंवा आयुष्यभर औषधं घ्यावी लागतात.
5. आहार आणि जीवनशैली? फायबर्स आणि आयोडीनयुक्त आहार घ्यावा. मुळेभाज्या आणि सोयाप्रॉडक्ट्स कमी करावेत. मध्यम व्यायाम, पुरेशी झोप आणि ताणतणाव कमी करणे आवश्यक आहे.
6. Thyroiditis हा एक दुर्लक्षित कारण आहे, जो प्रसूतीनंतर किंवा व्हायरल संसर्गानंतर ग्रंथीवर सूज निर्माण करतो. सुरुवातीला Hyperthyroid आणि नंतर Hypo होतो. योग्य निदान झाल्यास सहज उपचार करता येतो.
थायरॉईड कंट्रोल करता येतो, फक्त त्याला नीट समजून घ्यायला हवं!
हा माहितीचा पोस्ट खास करून ज्या महिलांना थकवा, केस गळती, वजन वाढ किंवा मूड स्विंग्स जाणवतात त्यांच्यासाठी शेअर करा.
डॉ. रवींद्र एल. कुलकर्णी, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts