Lifestyle
Inflammation म्हणजे काय?
गेल्या काही आठवड्यांत आपण Metabolism म्हणजे शरीर ऊर्जा कशी तयार करतं आणि वापरतं याबद्दल चर्चा केली.
पण अनेक आजार समजण्यासाठी अजून एक महत्त्वाची प्रक्रिया म्हणजे Inflammation समजणं गरजेचं आहे.
1️⃣ Inflammation म्हणजे काय? Inflammation म्हणजे शरीराची defence response आहे. शरीराला infection, injury किंवा metabolic stress जाणवल्यास शरीर दुरुस्तीची प्रक्रिया सुरू करतं.
• रक्तप्रवाह वाढतो • immune cells सक्रिय होतात • repair प्रक्रिया सुरू होते
थोड्या वेळासाठी होणारी ही प्रक्रिया शरीरासाठी आवश्यक असते.
2️⃣ समस्या कधी निर्माण होते? समस्या तेव्हा होते जेव्हा ही प्रक्रिया थांबत नाही. म्हणजेच शरीरात chronic low-grade inflammation दीर्घकाळ सुरू राहतो.
हळूहळू यामुळे अनेक आजार तयार होऊ लागतात.
3️⃣ अनेक आजारांमागचा समान धागा OPD मध्ये वारंवार दिसणारे आजार जसे Diabetes, Heart disease, Fatty liver, Obesity, PCOS आणि काही cancers यांच्या मागे अनेकदा chronic inflammation असतो.
4️⃣ Metabolism आणि inflammation Metabolism बिघडल्यावर: → fat storage वाढतो → insulin resistance वाढतो → inflammatory signals वाढू लागतात
म्हणजे metabolic disease आणि inflammation एकमेकांना वाढवत राहतात.
5️⃣ शरीरात inflammation कुठे तयार होतं? • fat tissue • liver • blood vessels • gut • mitochondria (पेशींचे energy factories)
6️⃣ ही series का? OPD मध्ये अनेकदा लोक म्हणतात “डॉक्टर, मला काहीच त्रास नाही.” पण शरीरात silent inflammation वर्षानुवर्षे चालू असू शकतो.
आणि आजार अनेकदा लक्षणं येण्यापूर्वीच तयार होतात.
पुढील पोस्टमध्ये सोप्या भाषेत पण वैज्ञानिक आधारासह समजावून सांगणार आहोत: • मायटोकॉन्ड्रिया आणि ऊर्जा निर्मिती • ऑक्सिडेटिव्ह ताण • पोटाभोवतीच्या चरबीमुळे होणारा दाह • आतड्यांमधील दाह • आहार आणि दाह यांचा संबंध • झोप आणि दाह यांचा संबंध
Inflammation समजलं तर lifestyle diseases समजायला एक नवीन दार उघडतं.
या नवीन “Inflammation Series” बद्दल तुमचं मत?
👍 उपयुक्त वाटतंय 🙂 उत्सुक आहे पुढील पोस्टसाठी 📚 पूर्ण series follow करणार
आरोग्याची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं हीच खरी prevention.
Dr Ravindra L Kulkarni MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts