Just For Hearts

Diabetes

कोणते डायबेटिक रुग्ण Reversal साठी योग्य नसतात?

Just For Hearts2 मिनिटांचे वाचन

कोणते डायबेटिक रुग्ण Reversal साठी योग्य नसतात?

आजकाल ‘Diabetes Reversal’ च्या जाहिराती पाहून अनेक रुग्ण मला एकच प्रश्न विचारतात - डॉक्टर, मला पण reversal होईल का? उत्तर एकदम स्पष्ट आहे: होईल… पण सगळ्यांना नाही. आणि हे न जाणून reversal करण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतो.

कोणते डायबेटिक रुग्ण Reversal साठी योग्य नसतात?

1) 8–10 वर्षांपेक्षा जुने diabetics Beta-cell capacity कमी असते. Reversal ची शक्यता खूप मर्यादित असते. Control सर्वात महत्त्वाचं आहे.

2) C-peptide कमी असणारे किंवा insulin वर वर्षांपासून असलेले patients Pancreas ची काम करण्याची ताकद कमी असते. संशोधनानुसार Low C-peptide = low reversal probability.

3) Type 1 Diabetes / LADA Autoimmune destruction होते. Reversal scientifically शक्य नाही. Best goal म्हणजे stable sugars.

4) Complications असलेले (neuropathy / kidney / retina issues) Aggressive diets सुरक्षित नसतात; sugar swings वाढू शकतात.

5) Frequent hypoglycemia असणारे Reversal diets मध्ये high risk असतो. Safety first.

6) Severe fatty liver + high triglycerides सुरुवातीला liver सुधारायला लागतो. Gradual approach सुरक्षित आहे.

7) Chronic steroid वापरणारे / medically complex cases Hormonal fluctuations reversal-friendly नसतात.

8) Lean diabetics (BMI < 22–23) Weight कमी असलेले Type 2 diabetics हे reversal साठी चांगले candidates नाहीत. Focus stability वर असावा.

9) Pregnancy planning / pregnant patients Reversal plans medically contraindicated आहेत.

10) Highly irregular lifestyle, stress, sleep disturbance Reversal programs मध्ये consistency आवश्यक असते. First step म्हणजे routine correction.

म्हणून लक्षात ठेवा, Reversal म्हणजे magic नाही, science आहे. योग्य रुग्णांमध्ये प्रभावी पण सगळ्यांमध्ये नाही.

हो, आमच्याकडे Diabetes Reversal plan मध्ये enrolled रुग्ण आहेत, पण केवळ genuine, medically योग्य रुग्णांसाठीच. इतर रुग्णांसाठी आम्ही सुरक्षित Safe Sugar Control वर लक्ष केंद्रित करतो.

तुमचा अनुभव काय? तुम्ही reversal programs केले आहेत का? खाली कमेंट करा, तुमच्या अनुभवांवर पुढच्या पोस्ट करू.

Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts

#diabetes#diabetes-reversal#blood-sugar-control#type-2-diabetes#diabetic-complications#safe-sugar-control
Share:WhatsAppXFacebook