Heart Health
कोणतं तेल वापरायचं? खरा मुद्दा आहे ते कसं वापरायचं
"तेल कोणतं वापरायचं?" हा प्रश्न नाही.
खरा मुद्दा आहे "तेल वापरायचं कसं?"
कारण अगदी तेल कमी करूनही BP, Cholesterol, Fatty Liver, acidity, PCOS हे प्रश्न कमी होत नाहीत.
कारण फक्त तेलाचं प्रमाण कमी केलं, पण चुकीच्या सवयी तशाच राहिल्या!
घराघरात अजूनही होणाऱ्या 10 चुका:
1. तेल तापवताना धूर येईपर्यंत गरम करणं. त्यामुळे toxic smoke compounds तयार होतात जे फुफ्फुस, हृदय आणि यकृतासाठी घातक आहेत. 2. एकच तेल वर्षभर वापरणं. शरीराला वेगवेगळे fatty acids लागतात. तेलांचे रोटेशन करा उदा. तीळ, मोहरी, शेंगदाणा, सुर्यफूल, सोयाबीन इत्यादी. 3. तेल पुन्हा पुन्हा reuse करून तळणं. एकदाच गरम झालेलं तेल ऑक्सिडाइज होतं आणि कॅन्सरकारक पदार्थ तयार होतात. 4. तेल आणि तुप यांचे कॉम्बिनेशन. काही कॉम्बिनेशन्स पचायला जड होतात आणि gut inflammation वाढवतात. 5. Refined oils वर अवलंबून राहणं. Cold pressed / wood pressed oils (लाकडी घाणा) हीच खरी पौष्टिक निवड आहे. 6. तेल पूर्णपणे टाळणं (No oil cooking!). Vitamin A, D, E, K हे सगळे तेलात विरघळणारे असून त्यांची उणीव हार्मोन बिघडवते. 7. रोज तळलेलं खाणं म्हणजे inflammation, insulin resistance आणि fatty liver वाढवणं. 8. नैसर्गिक फॅट्स विसरणं. ओलं खोबरं, बदाम, flax seeds, गुळवेल यामधील फॅट्स हे superfoods आहेत. 9. तेल अंदाजाने घालणं, चमच्याने न मोजता. त्यामुळे तेलाचं प्रमाण जास्त होते पण ते लक्षात येत नाही. 10. ही सवय बदलायला नकार देणं. घराघरात अशी वृत्ती आहे, पण ही दुर्लक्ष पुढे lifelong औषधांमध्ये बदलू शकते.
तेलाची निवड महत्त्वाची आहे, पण वापराचा पद्धत त्याहूनही जास्त महत्त्वाची आहे!
आजपासून रोजच्या तेल वापरावर, प्रकारावर, तापवायच्या पद्धतीवर आणि फॅट्सच्या समतोलावर लक्ष द्या.
ही माहिती तुमच्या आई, पत्नी, स्वयंपाक करणाऱ्या व्यक्ती आणि ऑफिसच्या मित्रांपर्यंत पोचवा.
आपण सगळेच "कुठलं तेल घालायचं" या चर्चेत अडकलो आहोत, पण यातून मार्ग काढणं गरजेचं आहे!
Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts