Diabetes
साखर का गूळ… का दोन्ही नको?
अनेक लोक म्हणतात, "मी साखर टाळतो पण गूळ खातो!" पण हे खरंच चांगलं आहे का?
१० मुद्द्यांत समजून घेऊया:
1. गूळ म्हणजे 'Natural Sugar' आहे पण 'Low Glycemic' नाही. गूळही रक्तातील साखर झपाट्याने वाढवतो, फक्त रंग नैसर्गिक असतो. 2. साखर 99% sucrose असते, म्हणजे glucose-fructose mix. गूळ 85–90% साखर असते, बाकी थोडी खनिजं (trace minerals). 3. डायबेटिक लोकांनी गूळ खाल्लं तर HbA1c वर थेट परिणाम होतो. 'हे नैसर्गिक आहे' या भ्रमामुळे जास्त घेतलं जातं. 4. 'Raw sugar', 'Brown sugar', 'Organic jaggery' ही नावे फसवणूक ठरू शकतात. गुणधर्म आणि blood sugar impact जवळपास सारखेच. 5. कॅलोरी आणि Glycemic Load दोघांचंही जवळपास सारखंच. म्हणून 'गूळ साखरेचा हेल्दी पर्याय' हे अर्धसत्य आहे. 6. कोण चांगलं? दोघंच 'Occasional, Limited Use' मध्येच ठीक. नियमित सेवन हानिकारक. 7. 'गूळात Iron आहे' म्हणतात पण ते प्रमाण अपुरं आणि inconsistent असतं. पालक, बीट, डाळी यातून चांगला iron मिळतो. 8. Cold, cough साठी गूळ वापरायला हरकत नाही पण तेही मर्यादित व वेळेपुरतं. रोजच्या चहात गूळ वापरणं हृदयासाठी वाईट. 9. लहान मुले आणि Adults दोघांनाही 'गोड सवय' लागते मग तो साखर असो वा गूळ. ही सवयच पुढचं नुकसान करते. 10. गोड हवंच आहे? मग फळ खा, दालचिनी वापरा, किंवा चवीनं खा पण रोजच्या चहात, खीरमध्ये साखर/गूळ नको.
गूळ 'थोडा चांगला' असला तरी तोही 'साखरच' आहे. डायबेटिक, pre-diabetic, वजन कमी करणारे, fatty liver, PCOS असलेल्यांनी दोघांपासूनही अंतर ठेवावं.
गोड खायचं, पण सुज्ञपणे.
"गोड खाल्ले हा गुन्हा नाही, पण रोजच्या सवयींनीच आजार वाढतात!"
ही पोस्ट जरूर शेअर करा, गूळ खाल्ल्यामुळे बरं होतंय असं समजणाऱ्यांसाठी!
Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts