Nutrition
मी मांसाहारी असूनही B12 कमी का होऊ शकते?
अनेक patients विचारतात, "मी मांसाहारी आहे, तरी B12 deficiency कशी होऊ शकते?"
B12 deficiency हे फक्त तुम्ही काय खात आहात यावर नाही तर ते शरीरात किती नीट absorb होत आहे यावरही अवलंबून असते.
कारणे समजून घ्या: 1. पचनसंस्था कमकुवत असणे: Acidity, gas, antacid औषधं आणि इतर पचनाशी संबंधित समस्या असल्यास B12 शरीरात नीट शोषलं जात नाही.
2. खाल्लेलं अन्न नीट absorb होत नाही: काही वेळेस शरीरात intrinsic factor नावाचा घटक कमी होतो, जो B12 शोषण्यासाठी आवश्यक असतो. तो नसल्यास B12 मिळूनही उपयोग होत नाही.
3. सतत ताण आणि झोपेचा अभाव: शरीराची गरज वाढते पण पूरवठा कमी पडतो.
4. जंतुसंसर्ग किंवा आतड्यांचे विकार: H. pylori infection, IBS, IBD यामुळे पचनात अडथळा येतो आणि B12 कमी होतो.
5. वय आणि औषधं: वय वाढल्यावर किंवा काही दीर्घकालीन औषधं (जसं की metformin, acidity चं औषध) घेतल्यास B12 कमी होतो.
थोडक्यात, मांसाहारी असणं म्हणजे B12 कमी होणार नाही याची शाश्वती नाही.
लक्षणे असल्यास तज्ञांच्या सल्ल्यानुसार तपासणी व treatment घेणे आवश्यक आहे.
Dr Ravindra L Kulkarni Just For Hearts