General Health
हॉस्पिटलमधील प्रत्येक समस्येसाठी डॉक्टर/नर्सवर का दोष दिला जातो?
तुम्ही कधी विचार केला आहे का की हॉस्पिटलमधील प्रत्येक समस्या डॉक्टर/नर्सवरच का टाकली जाते?
ही गोष्ट अगदी चुकीची असली तरीही, हे रोज घडत असते.
डॉक्टर/नर्सना कुठल्या गोष्टींसाठी दोष दिला जातो? पण प्रत्यक्षात त्यांचा त्यात काहीही संबंध नसतो:
1. रूम मिळण्यात विलंब बेड उपलब्धता ॲडमिन व बॅकएंड टीम ठरवते. डॉक्टरकडे यावर शून्य नियंत्रण असते.
2. औषध उपलब्ध नाही किंवा स्टॉक संपला फार्मसी सप्लाय चेनची जबाबदारी आहे. डॉक्टर फक्त प्रिस्क्राइब करतात, स्टॉक मॅनेजमेंट त्यांचे काम नाही.
3. इन्शुरन्स मंजूर झाली नाही किंवा पार्ट-पेमेंट जास्त आहे इन्शुरन्स TPA, कंपनी पॉलिसी, डॉक्युमेंटेशनमध्ये डॉक्टर किंवा नर्स यांचे निर्णय नसतात.
4. डिपॉझिट मागितले किंवा बिल जास्त वाटले हा हॉस्पिटलचा नियम आणि अकाउंट्सचा निर्णय आहे, उपचार देणाऱ्या डॉक्टरचा नाही.
5. डिस्चार्जला वेळ लागला डिस्चार्ज समरी, बिलिंग, TPA, औषधं, कागदपत्रं यामध्ये 5-7 विभाग काम करतात. डॉक्टर फक्त क्लिनिकल क्लिअरन्स देतात.
6. नातेवाईकांना बसायला जागा नाही किंवा असुविधा झाली हॉस्पिटल इन्फ्रास्ट्रक्चरची मर्यादा आहे. पण राग नर्स आणि वार्ड डॉक्टरवर व्यक्त होतो.
7. कँटीन, जेवण, स्वच्छता, वेटिंग टाइम हे पूर्णपणे हाऊसकीपिंग, ॲडमिन, कँटीन टीमचे विषय आहेत.
या सर्वांचा उपचारांशी काहीही संबंध नाही.
पण या गोष्टींवर राग व्यक्त करताना डॉक्टर नर्सवर अनावश्यक दबाव टाकल्यास रुग्णाच्या उपचारावर परिणाम होऊ शकतो.
आणखी एक कठोर सत्य म्हणजे बहुतेक क्रिटिकल प्रॉब्लेम्स हॉस्पिटलमध्ये नाही तर त्यापूर्वीच सुरू होतात.
उदाहरणे: • अनेक वर्षे BP/Diabetes दुर्लक्ष करणे • स्थूलता, स्मोकिंग, स्ट्रेस • अनियमित औषधं घेणे • वारंवार चेकअप टाळणे • 8–10 वर्षांचे जुने विकार - उदा. unmanaged diabetes • घरगुती उपायांवर वेळ घालवणे • अपघात / trauma
जेव्हा रुग्ण गंभीर अवस्थेत येतो, तेव्हा शरीरातील गोंधळ आधीच खूप असतो.
तो गोंधळ स्थिर होण्यासाठी वेळ लागतो. यासाठी कोणत्याही डॉक्टरकडे जादूची काठी नसते.
म्हणून नातेवाईकांनी काय करायला हवं?
1. उपचारातील शंका डॉक्टरशीच स्पष्ट करा. ही त्यांची जबाबदारी आहे. चुकीची मतं, अफवा, नातेवाईकांच्या सल्ल्यांनी निर्णय ढळू देऊ नका.
2. ॲडमिन/बिल/इन्शुरन्स/रूम या बाबतीत योग्य विभागाकडे तक्रार करा. डॉक्टरवर राग केल्याने उपचाराचा फोकस विचलित होऊ शकतो.
3. विश्वास नाही वाटत? लगेच दुसरं मत घ्या. हे तुमचं हक्क आहे. पण ओरडणे, धमकी देणे रुग्णालाच धोकादायक आहे.
4. क्रिटिकल अवस्थेत डॉक्टरला काम करू द्या. गर्दी, चर्चा, मतं, हस्तक्षेप यामुळे उपचार मंदावतात.
5. तणावात निर्णय घेतले जातात पण लक्षात ठेवा डॉक्टरही मानव आहेत.
6. Ward Dr / नर्सस्टाफवर दबाव आणू नका. तेच 24x7 बेडसाइडवर तुमच्या रुग्णाची काळजी घेत असतात.
❗ 'गंभीर चूक / निष्काळजीपणा' दिसल्यास काय करावे?
1. सर्व मेडिकल नोंदी ताबडतोब मागवा, हा तुमचा अधिकार आहे.
2. हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशनकडे औपचारिक तक्रार करा, डॉक्टर/सिस्टरकडे नाही.
3. स्वतंत्र Senior Consultant कडून केस रिव्ह्यू करून घ्या.
4. ग्रिव्हन्स सेल / राज्य हेल्थ डिपार्टमेंटला कळवा.
5. पुरावे असतील तरच Consumer Court / Medical Council मार्ग अवलंबा.
चला यावर खुलेपणाने चर्चा करूया...
तुमचा अनुभव काय आहे? तुम्ही रुग्ण, नातेवाईक किंवा डॉक्टर कुणीही असलात, तुमची मते महत्त्वाची आहेत.
हा पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा, विशेषतः डॉक्टर्स, स्टाफ नर्सेस, वार्ड टीम, हॉस्पिटल ॲडमिन आणि आपल्या कुटुंबीयांपर्यंत.
आरोग्यसेवा अधिक सुरक्षित आणि सन्मानपूर्वक ठेवण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे.
आपण बोललो तरच बदल घडतात.
Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts