Diabetes
माझी साखर नॉर्मल असूनही मी इतका थकतो का?
“सर, माझी साखर नॉर्मल येते, तरी मी इतका थकतो का?”
कदाचित तुमची साखर ‘स्पाईक’ होते आणि तुम्हाला कळत नाही! हा गुपचूप होणारा धोका म्हणजे Silent Sugar Damage.
Sugar Spike म्हणजे काय?
- जेवल्यानंतर अचानक साखर 180 mg/dL पेक्षा जास्त जाणे. - ही साखर थोड्या वेळाने कमी होते, पण शरीरावर परिणाम चालू राहतो.
Sugar Spike चे 5 लक्षात ठेवण्यासारखे संकेत: 1. जेवणानंतर झोप येणे 2. डोके जड वाटणे, थकवा किंवा चिडचिड 3. गोड खाण्याची जबर इच्छा 4. पायांमध्ये अचानक अशक्तपणा 5. रोजची साखर नॉर्मल असली तरी तब्येत विस्कळीत वाटणे
Sugar Spike कसा ओळखायचा? - Post Meal Sugar (जेवल्यानंतर 1.5 ते 2 तासांनी) मोजा. - 180 mg/dL किंवा त्याहून अधिक म्हणजे Postprandial Hyperglycemia. - फक्त फास्टिंग साखर मोजणे पुरेसे नाही – लोक यामध्ये चूक करतात!
Sugar Spike टाळण्यासाठी 5 पुराव्यावर आधारित उपाय: 1. भाजी आणि प्रोटीन आधी खा. 2. जेवणात मधून मधून snack टाळा. 3. जेवल्यानंतर 15 मिनिटं फिरा. 4. वेगवेगळ्या वेळी साखर मोजा. 5. कुठल्या जेवणानंतर spike होतो हे नोंद ठेवा.
संपूर्ण जगाचा अनुभव आणि ADA Guidelines सांगतात: Post meal sugar spike = भविष्यातील गुंतागुंत → Retinopathy, Neuropathy, Weight Gain, Heart Disease.
माझा 25 वर्षांचा अनुभव सांगतो: “रुग्ण म्हणतात साखर नॉर्मल आहे, पण neuropathy, weakness, वजन वाढ चालूच असते. जेव्हा आम्ही Post Meal sugar तपासतो तेव्हा spike सापडतो!”
साखर फक्त नॉर्मल राहणे पुरेसे नाही, ती stable राहणे गरजेचे आहे!
Sugar Spike चा ट्रॅक ठेवा. तो तुमचा Health Score बदलू शकतो.
ही Sugar Spike awareness पोस्ट फॉरवर्ड करा, कारण लाखो लोकांची साखर नॉर्मल असूनही शरीर दुखत आहे, कारण ते लक्षात आलेले नाही!
डॉ. रवींद्र एल. कुलकर्णी, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts