Just For Hearts

Heart Health

थंडीच्या सकाळी Heart Attack का वाढतात?

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

थंडीच्या सकाळी Heart Attack का वाढतात?

वैज्ञानिक कारणे:

1. थंडीमुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात (Vasoconstriction) हृदयाला रक्त पोहोचवणाऱ्या वाहिन्यांमध्ये जागा कमी होते, आणि Blood Pressure वाढतो. 2. Platelet stickiness वाढते रक्त “घट्ट” होतं, आणि रक्ताचे गाठी (clots) सहज तयार होतात ज्यामुळे sudden blockage होतो. 3. Sympathetic system हाय-अ‍ॅक्टिव्ह होतो Adrenaline वाढल्याने हृदयाचा ठोका वेगाने वाढतो. जास्त मागणी, पण मर्यादित पुरवठा = धोका. 4. रात्रभर झोपेनंतर अचानक उठणे शरीर पूर्ण थंड असताना उठणं, bathroom मध्ये अचानक effort घेणं, हृदयाला धक्का. 5. सकाळी 4–8 दरम्यान ‘BP Surge’ आणि ‘Heart Rate Dip’ एकत्र येतो हे mismatch अनेक cardiac arrests मागे असलेला invisible कारण असतो.

हृदयविकार रोखण्यासाठी 7 अनुभवाधारित सल्ले: (सामान्य + हृदय रुग्णांसाठी)

1. गरम कपडे, गरम पाणी, शरीर “warm-up” केल्याशिवाय बाहेर जाऊ नका. 2. पहाटेचा व्यायाम चुकवू नका, पण वेळ/पद्धत समजून घ्या, झोपेतून उठताक्षणी व्यायाम करू नका. 3. पाणी कमी पिऊ नका, रक्त concentrate होते थंडीमध्ये. 4. झोपेतून उठताना वाफाळलेलं पाणी आणि सौम्य हालचाली आधी करा. 5. नियमित औषधं, आणि सकाळी ECG/ BP तपासणी cardiac patients साठी mandatory. 6. अचानक चक्कर, धाप लागणं, छातीत जडपणा असल्यास क्षणाचाही विलंब नको. 7. हिवाळ्यात लक्षणं subtle असतात. chest pain नसेल तरी heart attack होऊ शकतो.

❤️‍🔥 “थंडीने थरार होऊ नये… हृदय सांभाळा.” हृदय सांभाळणं म्हणजे आजची शौर्यगाथा आहे.

Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts

#heart-attack#cold-weather#vasoconstriction#platelet-stickiness#bp-surge#cardiac-health#heart-care
Share:WhatsAppXFacebook