Just For Hearts

Diabetes

डायबेटीसमध्ये वजन कमी असूनही साखर का वाढते?

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

अनेक डायबेटीस रुग्णांना वजन कमी असूनही साखर नियंत्रणात न येण्याचा प्रश्न भेडसावतो. औषधं चालू असूनही साखर का वाढते, जेवण कमी करून चालणं वाढवलं तरी थकवा का वाढतो, हे अनेकांना समजत नाही.

डॉक्टर, डाएटिशियन आणि पेशंट्सही दुर्लक्षित करणं म्हणजे स्नायूंची कमतरता (Low Muscle Mass).

२५ वर्षांच्या अनुभवातून सांगायचं झालं तर डायबेटीस नियंत्रणात “स्नायू” हे गुपित शस्त्र आहे.

१. वजन कमी झालं म्हणजे साखर नियंत्रणात येईलच असे नाही. जर स्नायूंचं वजन कमी झालं, तर रक्तातील साखर पेशींमध्ये जाऊ शकत नाही.

२. डायबेटीस रुग्णांमध्ये स्नायू लवकर कमी होतात. वाढतं वय, uncontrolled sugar, protein कमी, inactivity हे कारणीभूत घटक आहेत.

३. स्नायूंमध्येच ग्लुकोज स्टोरेज आणि insulin काम करतं. स्नायू कमी म्हणजे insulin नीट काम करत नाही, ज्यामुळे शुगर fluctuations, थकवा आणि अशक्तपणा होतो.

४. Bioimpedance Test करून खरी स्थिती समजते. ही painless टेस्ट ५ मिनिटांत Muscle%, Fat%, Metabolic Age दाखवते. दर २–३ महिन्यांनी टेस्ट करून सुधारणा ट्रॅक करता येते.

५. स्नायू वाढवण्यासाठी कृती: - Protein ७०–१०० gm/day - Leucine, Myo-Inositol, HMB (डॉक्टर सल्ल्याने) - सकाळी/दुपारी Protein + Supplement - रोजचे पायाचे व्यायाम

६–८ आठवड्यांत फरक जाणवतो.

विचार करा: शुगरसाठी गोळ्या घेतल्या पण स्नायूंना काही दिलं नाही, मग शरीर साखर कुठे साठवणार?

गोळ्यांबरोबर आहार, व्यायाम आणि स्नायूंची काळजी घ्या.

स्नायू वाढवले म्हणजे साखर कमी!

डॉ. रवींद्र एल. कुलकर्णी, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts

#diabetes#muscle-mass#protein#bioimpedance-test#sugar-control#fatigue#exercise
Share:WhatsAppXFacebook