Just For Hearts

Lifestyle

डिजिटल युगात उपचार अजूनही क्लिनिकपुरतेच का?

Just For Hearts2 मिनिटांचे वाचन

डिजिटल युगात फोन रिचार्ज, बँकिंग, शॉपिंग, ट्रेन तिकीट सगळं घरबसल्या शक्य आहे. पण डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी अजूनही रांगा, ट्रॅफिक आणि पार्किंगचा त्रास का सहन करावा लागतो?

वेळ आणि ऊर्जा वाचवण्यासाठी टेली-कन्सल्टेशन हा नव्या काळाचा उपाय आहे.

टेली-कन्सल्टेशनने सहज हाताळता येणारे 10 प्रसंग:

1. ताप, सर्दी, खोकला 2. अपचन, गॅसेस, acidity 3. BP / Sugar थोडं वाढलेलं 4. पित्त, उलट्या, अशक्तपणा 5. अंगदुखी, थकवा, Weakness 6. जुना allergy किंवा त्वचेचा त्रास 7. सध्या सुरू असलेल्या औषधांसंदर्भात मार्गदर्शन 8. reports वाचून सल्ला 9. प्रवासात असताना सल्ला 10. diet, routine किंवा supplements बदलायचे असतील

डिजिटल प्रिस्क्रिप्शनचे फायदे: • घरबसल्या वैध प्रिस्क्रिप्शन मिळते • Online pharmacy साठी उपयोगी • आरोग्याचा रेकॉर्ड म्हणून साठवता येतो • भविष्यातील डॉक्टरला हेच आधार देता येतो (डिजिटल स्वाक्षरी असलेली प्रिस्क्रिप्शन वैध असते.)

टेली-कन्सल्टेशनचे फायदे: • वेळ आणि प्रवास वाचतो • ट्रॅफिक, पार्किंगचा त्रास नाही • घरात BP / Sugar readings असतील तर निदान शक्य • आपल्या भागाबाहेरही तज्ञांपर्यंत पोहोचता येतो • follow-up साठी अतिशय सोयीचं

तुमचे डॉक्टर टेली-कन्सल्टेशन देत असतील तर तो उत्तम पर्याय आहे. पण अनेक डॉक्टरांना तांत्रिक मर्यादा, वेळेची अडचण किंवा सुविधांचा अभाव जाणवतो, त्यामुळे अनेक रुग्ण योग्य सल्ला घेण्यात अडखळतात.

मी स्वतः माझ्या रुग्णांना लहान आजारांसाठी टेली-कन्सल्टेशनसाठी प्रोत्साहन देतो, जेणेकरून घरबसल्या सल्ला मिळावा.

आज पुणे, नागपूर, अमरावती, नोएडा, दिल्ली, अगदी आगरतळा सारख्या दूर प्रदेशातून नियमित सल्ला घेतला जातो, अर्थात पूर्वनियोजित वेळ आणि गैर-आपत्कालीन कारणासाठी.

तुमचे डॉक्टर जर असा सल्ला देत नसतील तर नक्की संपर्क साधा आणि खात्री बाळगा, तुम्ही सुरक्षित हातात आहात.

Tele-Consultation ही सुविधा आहे, पर्याय नाही. उद्याचं आरोग्य डिजिटल आहे, सुरुवात आजच करा!

डॉ. रवींद्र एल. कुलकर्णी, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts

⚠️ Disclaimer: Emergency परिस्थितीत (उदा. छातीत दुखणं, श्वास घेण्यात त्रास, खूप ताप) त्वरित जवळच्या रुग्णालयात जावं.

#tele-consultation#digital-health#online-doctor#healthcare#digital-prescription#minor-illness#health-advice#convenience
Share:WhatsAppXFacebook