Weight Management
Scan न करता Visceral Fat कसं ओळखाल?

पोटातील Visceral fat किती आहे, हा सर्वात common प्रश्न आहे. अनेक जण म्हणतात -“Doctor, मशीन नाही… मग मला कसं कळणार?” खरं सांगायचं तर - शरीर आधीच संकेत देत असतं, Scan नंतर येतो.
1. Visceral fat मोजतात कसं? (Scientific)
अचूक मोजमापासाठी CT scan / MRI वापरतात. काही Machine (BIA scale) Visceral fat level दाखवतात (उदा. Karada).
2. Range काय मानलं जातं?
Machine नुसार फरक असतो, पण साधारण: 1–9 = acceptable 10–14 = वाढलेला धोका 15+ = जास्त धोका
म्हणजेच आतील चरबी वाढली की Disease risk वाढतो.
3. मग सगळ्यांनी Scan करायला हवं का?
नाही. रोजच्या OPD मध्ये आपण साधे संकेत वापरतो कारण Risk आधी सुरू होतो, Scan नंतर दाखवतो.
4. माझे Simple assessment hacks (अनुभवातून)
पोट ताठ आणि घट्ट आहे? → आतली चरबी (Visceral fat) जास्त असण्याची शक्यता. वजन जास्त नाही पण पोट आहे? → बाहेरून बारीक, आत चरबी (Thin outside, fat inside). कंबर आणि छातीचा फरक कमी झालाय? → Central fat वाढतंय. बसून काम + हालचाल कमी? → Metabolic risk वाढतो. थकवा + जेवणानंतर जडपणा? → शरीरावर ताण वाढलेला.
5. सर्वात Practical tool
Waist measurement (कंबर मोजणं) * पुरुष ≥ 90 cm * स्त्रिया ≥ 80 cm यापेक्षा जास्त = Visceral fat वाढलेलं समजा.
Height च्या तुलनेत कंबर: Waist ÷ Height < 0.5. उदा. उंची 170 cm → कंबर < 85 cm. हा साधा नियम खूप Accurate आहे.
6. कधी सावध व्हायचं?
Scan ची वाट बघू नका, कंबर वाढते आहे म्हणजे Process सुरू झालेला आहे.
काय लक्षात ठेवायचं?
Machine नंबर सांगतं, पण शरीर आधीच Warning देत असतं. Diagnosis report मध्ये दिसतो, पण Disease शरीरात आधीच सुरू झालेला असतो.
तुम्ही कधी Scan शिवाय स्वतःचा Risk assess केला आहे का? 👍 हो 🙂 आता सुरू करेन ❤️ आज नवीन समजलं
जर उपयुक्त वाटलं तर ही पोस्ट मित्र-परिवारात Share करा, अनेक जण अजूनही फक्त Machine वर अवलंबून असतात.
Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts