General Health
ब्रँडेड vs जनरिक औषधं – एवढा गोंधळ का निर्माण होतोय?
ब्रँडेड vs जनरिक औषधं – एवढा गोंधळ का निर्माण होतोय? चला कारणे पाहूया:
1. डॉक्टरांनी लिहिलं औषध महाग असतं, पण मेडिकलवर विचारलं की "हेच जनरिक आहे स्वस्तात," तर शंका निर्माण होते.
2. मेडिकलवाले आपोआप दुसरं ब्रँड देतात, ज्यामुळे प्रश्न पडतो, "बदल चालतो का? डॉक्टर सांगितलेलं न पाळल्यामुळे त्रास होणार नाही ना?"
3. नेटवर, WhatsApp वर, YouTube वर लोक म्हणतात – "Generic म्हणजे तेच औषध, ब्रँड म्हणजे पैसे कमवण्याचा प्रकार!"
4. एका आजारासाठी दोन रुग्ण वेगवेगळी औषधं घेतात, त्यामुळे वाटतं, "आपण जास्त का देतोय?"
5. दीर्घकालीन औषधं महाग वाटतात, त्यामुळे दर महिन्याला खर्च कमी करण्यासाठी स्वस्त पर्याय हवा असतो.
6. सरकारी हॉस्पिटलमध्ये फ्री औषधं मिळतात, मग खासगी डॉक्टर वेगळी औषधं का लिहितात?
7. औषध कंपन्यांची जाहिरातबाजी आणि मार्केटिंगमुळे ब्रँडेड औषधं लोकप्रिय होतात, जनरिक दुर्लक्षित राहतात.
8. डॉक्टर आणि मेडिकल यांच्यात संवाद कमी असल्यामुळे रुग्ण अडकतो – कोणाचं ऐकायचं?
9. रुग्ण आणि केअरगिव्हर्सना फार्माकोलॉजीची माहिती नसते, त्यामुळे "Salt तेच आहे" की "टेक्नॉलॉजी वेगळी" हे कळत नाही.
10. डॉक्टरांवर आरोप होतात – "ब्रँड लिहितात कमिशनसाठी," पण त्यामागे क्लिनिकल अनुभव आणि विश्वास असतो हे दुर्लक्षित होतं.
पुढच्या पोस्टमध्ये पाहू – जनरिक आणि ब्रँडेड औषधांमध्ये नेमका फरक काय? आणि रुग्णांनी काय निवडावं?
पण त्याआधी… तुम्हाला वाटतं का की हे प्रश्न खरे आहेत? तुमचाही अनुभव काय सांगतो? कमेंटमध्ये नक्की लिहा.
Dr Ravindra L Kulkarni Just For Hearts