Just For Hearts

Lifestyle

सतत यश हवंय? मग यश साजरं करणं शिका

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

सतत यश हवंय? मग यश साजरं करणं शिका.

प्रत्येक लहान यश Celebrate करा. सवयी टिकतात कारण मेंदू त्यांना “reward” मानतो. (B.J. Fogg - “Emotions create habits.”)

रुग्ण जेव्हा BP control करतात आणि मी त्यांना openly शाबासकी देतो, तेव्हा ते पुढे routine तपासणं विसरत नाहीत. हीच power आहे positive emotion ची.

1. आजचा walk पूर्ण केला? आरशात बघून, स्वतःला “Well done!” म्हणा.

2. भूक लागल्यावरही junk टाळलं? आपल्या आवडत्या healthy drink ने toast करा.

3. BP / Sugar चांगलं आलं? एक छोटं सेलिब्रेशन करा, कुटुंबासोबत शांत वेळ घालवा.

4. १ आठवडा नियमित घरचा खाणं घेतलं? मग मनापासून स्वतःची पाठ थोपटून घ्या.

5. आज डॉक्टरच्या सल्ल्याने काहीतरी बदल केलं? त्या सल्ल्याला एक “Thank you” message करा.

जेव्हा मेंदूला भावनिक आनंद मिळतो तेव्हा तेच वर्तन मेंदू लक्षात ठेवतो आणि तीच सवय घट्ट बसते.

तुमचं असं छोटं सेलिब्रेशन काय असू शकेल? कॉमेंट करा, इतरांनाही प्रेरणा मिळू शकेल.

Dr Ravindra L Kulkarni MD DNB FSCAI Cardiology Just For Hearts

#tiny-habits#emotional-health#healthy-lifestyle#cardiology#bp-control#positive-emotions
Share:WhatsAppXFacebook