Just For Hearts

Lifestyle

Blood Pressure, Diabetes आणि वजन नियंत्रणासाठी तुमची चालण्याची पद्धत योग्य आहे का?

Just For Hearts2 मिनिटांचे वाचन

तुमचा Blood Pressure आहे? साखर वाढतेय? वजन घटत नाही? मग चालायला जाताय ते योग्य पद्धतीने का?

High BP असणाऱ्यांसाठी चालण्याची योग्य पद्धत: 1. स्लो ते मिडियम स्पीड: 4–5 km/hr च्या वेगाने चालणं, झपाट्याने नाही, कारण झपाट्याने चालल्यास BP वाढू शकतो. 2. सातत्य ठेवा: दिवसातून 30 मिनिटं, आठवड्यातून किमान 5 दिवस. 3. स्ट्रेस कमी होईल अशी चाल: शांत, नैसर्गिक वातावरणात चालणं – मानसिक आरोग्यावरही फायदा होतो. 4. बॉडी सिग्नल्स ऐका: चक्कर, श्वास लागणे, जडपणा वाटल्यास थांबा. पाणी प्या.

Diabetes असणाऱ्यांसाठी चालण्याची पद्धत: 1. भुकेल्या पोटी चालू नका: विशेषतः मधुमेहींनी चालायला जाताना काहीतरी खाल्लेलं असावं. 2. मध्यम ते झपाट्याने चालणं: 5–6 km/hr pace हे insulin sensitivity वाढवतो. 3. जेवणानंतर चालणं: जेवणानंतर 10–15 मिनिटांची चाल postprandial sugar कमी करते. 4. पायांची निगा: diabetic foot चा धोका असल्याने चांगले स्पोर्ट शूज आवश्यक.

Overweight / Obese रुग्णांसाठी चालण्याची पद्धत: 1. Low-impact पण Long-duration: हळूहळू चालून वेळ वाढवा, सुरुवातीला 20 मिनिटं, नंतर 45 मिनिटं. 2. Incline किंवा ढलान असलेलं चालणं: fat burning साठी प्रभावी (उदा. पार्कमधील चढ-उतार). 3. Consistency > Speed: सतत रोज चालणं > फक्त रविवारी जोरात चालणं. 4. Joint care: गुडघ्यांवर ताण येऊ नये म्हणून योग्य शूज वापरा, गरज लागल्यास physiotherapist चा सल्ला घ्या.

जर एखाद्या रुग्णाला BP + Diabetes + Weight वाढलेले असतील तर? 1. सुरुवात slow करा, हळूहळू वाढवा. उदाहरणार्थ, सुरुवातीला 15-20 मिनिटं, नंतर वेळ वाढवा. 2. Mixed style walking: Flat surface + हलका चढ + जेवणानंतरची शॉर्ट वॉक. 3. कधी चालायचं? सकाळी चालायला गेलं तरी, रात्रीच्या जेवणानंतर 10 मिनिटं हलकं चालणं अनिवार्य. 4. Tracking: BP, Sugar, आणि वजन साप्ताहिक ट्रॅक ठेवा.

तुमची चालण्याची पद्धत योग्य आहे का? - फक्त ‘चालतो’ म्हणजे योग्य चालताय का? - तुमच्या आरोग्यप्रमाणे चालण्याचा वेग आणि वेळ योग्य आहे का?

कमेंट करा आणि चर्चेत भाग घ्या!

Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts

#blood-pressure#diabetes#weight-management#walking#health-tips#fitness#heart-health
Share:WhatsAppXFacebook