Diabetes
डायबेटीस म्हणजे फक्त साखरेचा आकडा नाही तर ही तुमच्या शरीराची रोजची झीज आहे!
डायबेटीस म्हणजे फक्त साखरेचा आकडा नाही तर ही तुमच्या शरीराची रोजची झीज आहे!
Sugar spikes म्हणजे काय? 1. जेवणानंतर साखर वाढणे हे नॉर्मल आहे, पण ती वेळेत खाली येणे आवश्यक आहे. 2. Spike म्हणजे अचानक, जास्त आणि दीर्घकाळ टिकणारी साखर वाढ, उदा. 90 mg/dL वरून 220 mg/dL पर्यंत पुन्हा पुन्हा होणे, तर धोका निश्चित आहे!
Sugar spikes शरीराला काय नुकसान करतात? 1. Micro vessels तुटतात ज्याचा परिणाम डोळे, मूत्रपिंड, मेंदू आणि पायांवर होतो. 2. रक्तातील साखर जास्त राहिल्यास रक्ताचा प्रवाह कमी होतो, रक्त जडसर होते, सूक्ष्म रक्तवाहिन्यांमध्ये प्रवाह मंदावतो आणि हृदयावर ताण वाढतो. 3. Nervous सिस्टीम डॅमेज होते, हातपाय सुन्न होणे आणि जळजळ होणे. 4. Inflammation वाढल्यामुळे हळूहळू हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. 5. थकवा आणि मानसिक अस्थिरता होते, कामाचा मूड लागत नाही. 6. किडनीची क्षमता कमी होते, urine मधून protein leak होतो.
साखर spike कधी सुरू होतो? - HbA1c > 6.5 असल्यास risk सुरू होतो. - Post-meal sugar > 180 असल्यास नुकसान सुरू होते. - दिवसातून 2–3 वेळा spike होणे म्हणजे chronic damage.
तुमचं शरीर सतत हे संकेत देतं, लक्ष द्या! - थकवा असूनही साखर वाढलेली असते. - अचानक धडधड किंवा घाम येणे. - डोळ्यासमोर अंधारी किंवा blurred vision. - मूड बदलणे आणि चिडचिड होणे.
साखर नियंत्रणासाठी 3 सोप्या सवयी: 1. Fiber आधी आणि नंतर Carbs खा. 2. 15–30 मिनिटं चालणं, जेवणानंतर किमान एकदा तरी. 3. गोड कमी करा, smart substitutes वापरा.
शेवटी लक्षात ठेवा: "रक्तातील वाढलेली साखर म्हणजे तुमच्या हृदयाच्या आत सुरू झालेला सूज आणि झीज. ती थांबवायची की चालू द्यायची, हे तुमच्याच हातात आहे!"
हा संदेश तुमच्या कुटुंबात, मित्रांमध्ये आणि पेशंट्स ग्रुपमध्ये जरूर शेअर करा. कोणत्या सवयीने तुमची साखर spike होते? खाली कमेंट करा, आपण त्यावर चर्चा करूया.
Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts