Lifestyle
मी Heart आणि Diabetes रुग्ण आहे, तर दिवाळीला गोडधोड, फराळ खाऊ नये का?
“मी Heart आणि Diabetes रुग्ण आहे, तर दिवाळीला गोडधोड, फराळ खाऊ नये का?” हा नेहमी विचारला जाणारा प्रश्न आहे.
दिवाळी म्हणजे आनंद, एकत्र येणं, गोडधोड, आणि आठवणींचा साठा. मी कधीच म्हणणार नाही की Heart पेशंट किंवा Diabetes असलेल्यांनी सण साजरा करू नये. पण लक्षात ठेवा की सणाची खरी मजा ‘आरोग्य’ आणि ‘मर्यादा’ यातच टिकते.
Heart / Diabetes रुग्णांसाठी 7 टिप्स:
1. ताट भरू नका, मन भरून खा. पोट फुलेपर्यंत जेवणं टाळा. गोडाचा छोटासा स्वाद घेणं हरकत नाही!
2. गोडाचा धक्का नको, छोट्या portions पुरेसे. साखर आणि Blood Pressure दोघंही अचानक वाढू शकतात, विशेषतः जेवणानंतर.
3. औषधं विसरू नका, वेळेवर घ्या. दिवाळीतही आपलं शरीर वेळेवर औषधं अपेक्षित करतं.
4. जेवणानंतर 10 मिनिटं चालायला जा. शरीराला मदत करा. चालणं = हृदयावर ताण कमी.
5. दिवसभर पाणी प्या पण अति करू नका. Heart failure किंवा Kidney problem असलेल्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
6. रात्रभर जागरण टाळा, झोप महत्त्वाची आहे. दिवाळीची शांत झोप ही शरीरासाठी उपचार आहे.
7. सण साजरा करताना स्वतःच्या मर्यादा ओळखा. जे जमतं ते करा, जे त्रासदायक ठरेल ते थोडं बाजूला ठेवा.
सणाचे क्षण ‘खाण्यासाठी’ नव्हेत, ‘जगण्यासाठी’ असतात! आपलं हसू, आरोग्य, आणि उपस्थिती हे आपल्या प्रियजनांसाठी खरा गोडधोड आहे.
सर्वांना आरोग्यदायी, आनंदी दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! शुभ दिवाळी 🪔🙏🏻
Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts