Just For Hearts

Sleep

स्वप्न पडणं म्हणजे मेंदूचा WhatsApp चालू झाल्याप्रमाणे

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

स्वप्न पडणं म्हणजे मेंदूचा WhatsApp चालू झाल्याप्रमाणे समजा.

स्वप्नं का पडतात हे समजणं म्हणजे फक्त झोपेत घडणारी गोष्ट नाही, ती झोपेचीच कथा आहे!

तुम्हालाही अशी स्वप्नं येतात का? - एखाद्या बोर्डाच्या परीक्षेला पेपर विसरल्याचं स्वप्न? - एस्केलेटरवर धावताय पण वरच जात नाही? - कोणी तरी पाठलाग करतंय पण आपण जिथे पोहोचायचं तिथे जाताच येत नाही?

ही स्वप्नं Random वाटली तरी ती Relevant असतात!

झोप म्हणजे दोन भागांची सिनेमासारखी गोष्ट:

1. NREM: 'Mute' मोडमध्ये बॉडी रिपेअर वर्क सुरू - हार्मोन्सचं संतुलन - रोगप्रतिकारशक्ती बळकट - शुगर, Blood Pressure नियंत्रणात

2. REM: 'Theatre Mode' सुरू, म्हणजे स्वप्नांचा शो! - मेंदूचे फोटोज आणि विडिओ एडिट होतात - Unfinished thoughts, suppressed stress यांचा संग्रह - खरं सांगायचं तर, आपण झोपलो तरी मेंदू निवांत नसतो!

वैद्यकीय दृष्टिकोनातून: - जे लोक झोपेत घुटमळल्याचं, आवाज निघत नसल्याचं स्वप्न पाहतात त्यांना Obstructive Sleep Apnea ची शक्यता - वारंवार failure / chasing स्वप्नं असल्यास Anxiety disorders ची शक्यता

झोप म्हणजे फक्त विसावा नाही, ती मेंदूची सफाई मोहिम आहे! स्वप्नं म्हणजे त्यातले मेमो जर नीट वाचले, तर आरोग्य सुधारता येतं.

तुमचं शेवटचं विचित्र स्वप्न काय होतं? ते समजलं का? की अजूनही 'Part 2' ची वाट बघताय?

कॉमेंट करा, कारण काही वेळा स्वप्नांतलं गोंधळ, हीच झोपेच्या आरोग्याचे पहिले लक्षण असते.

Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts

#dreams#sleep#rem#nrem#obstructive-sleep-apnea#anxiety#sleep-health
Share:WhatsAppXFacebook