Mental Wellness
आनंद नाही, दु:ख नाही: Emotional Numbness समजून घेऊया
आनंद नाही… दु:ख नाही… Emotional Numbness. काहीच वाटत नाही, हे normal आहे का?
पूर्वी छोट्या गोष्टीत आनंद यायचा… कधी कधी रडूही यायचं…
आता सगळं आहे… पण आत काहीच हलत नाही.
ना आनंद… ना दु:ख… फक्त “रिकामं” वाटतं.
1. हे नेमकं काय आहे? ही कमजोरी नाही… ही Emotional Numbness आहे.
भावना संपत नाहीत… त्या थोड्या वेळासाठी “शांत” होतात.
2. असं का होतं? मन सतत ताण सहन करतं. भावना दाबल्या जातात. एकटेपणा, थकवा साठत जातो.
आणि एक वेळ येते मन स्वतःला protect करतं.
“आता काहीच जाणवू नको” असा mode सुरू होतो.
3. Subtle Signs * आवडत्या गोष्टीत interest कमी होणं. * लोकांमध्ये असूनही जुळत नाही असं वाटणं. * reaction कमी होणं. * “मला काय वाटतंय?” हेच कळेनासं होणं.
4. शरीर काय सांगतं? * energy कमी वाटते. * काही करण्याची इच्छा नसते. * झोप बदलते. * छातीत रिकामेपणा जाणवतो.
मन शांत दिसतं… पण आतून disconnected असतं.
5. एक महत्त्वाची जाणीव “मला काहीच वाटत नाही” हा problem नाही…
हा signal आहे की मन खूप काही सहन करून थकलं आहे.
6. काय करायचं? भावना परत जाणवायला वेळ लागतो.
* स्वतःवर जबरदस्ती करू नका. * छोट्या गोष्टी notice करा. * routine सुरू ठेवा, जरी मन नसेल तरी. * कुणाशी तरी बोला, जरी शब्द कमी असले तरी.
आणि कधी कधी… counselling खूप मदत करतं.
25+ वर्षं जीवन-मरणाच्या सीमारेषेवर काम करताना… रुग्णांच्या भावना, नाती आणि थकवा जवळून पाहिला आहे.
रोज जाणवतं Treatment महत्त्वाचे आहेत… पण समजून घेणं अधिक महत्त्वाचं आहे.
म्हणूनच आज अनेक जण बोलण्यासाठी, समजून घेण्यासाठी पुढे येतात.
शांत वाटणं आणि काहीच न वाटणं, यातला फरक समजला पाहीजे.
तुम्हालाही कधी असं वाटतं का?
कधी कधी… फक्त कोणीतरी ऐकणंही Treatment असतं.
Dr Ravindra L Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts