Heart Health
Heart Failure (LVEF <45%) असल्यास घरी काळजी कशी घ्याल?
Heart Failure (LVEF 45% पेक्षा कमी) असल्यास तुमचं हृदय रक्त कमी प्रमाणात पंप करतं. त्यामुळे शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही आणि थकवा, श्वास लागणे, सूज यांसारख्या समस्या होतात. दररोजची घरची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे.
1. दररोज वजन तपासा: 2–3 दिवसांत 2 किलोने वाढ झाली तर डॉक्टरांना कळवा. 2. Blood Pressure आणि pulse मोजा: जास्त किंवा कमी असल्यास नोंद ठेवा. 3. औषधं वेळेवर घ्या: डोस चुकवू नका. 4. मीठ आणि पाणी मर्यादित ठेवा: जास्त मीठ आणि पाणी हृदयावर ताण आणते. 5. श्वास लागणे, छातीत दुखणे, पायांना सूज वाढणे यांसारखे लक्षणं दिसल्यास लगेच डॉक्टरांना कळवा. 6. धूम्रपान-मद्यपान पूर्णपणे बंद करा: हृदयाचं नुकसान कमी होतं. 7. हलकी चाल व श्वासोच्छ्वास व्यायाम करा: डॉक्टरांनी सांगितलेलेच करा. 8. आरोग्यदायी आहार आणि नियमित झोप घ्या: शरीराला विश्रांती मिळते आणि ताण कमी होतो.
अशा patients साठी Cardiac Rehab Program फार महत्वाचा असतो. योग्य व्यायाम, आहार आणि जीवनशैली बदल शिकवून हृदयाची क्षमता वाढवतो, लक्षणं बिघडण्यापूर्वी ओळखायला मदत करतो आणि अचानक होणारे हॉस्पिटलायझेशन कमी करतो.
कार्डियाक रिहॅब प्रोग्रामबद्दल प्रश्न असल्यास चर्चा करा आणि ही माहिती अशा रुग्णांपर्यंत पोहोचवा ज्यांना याची खरोखर गरज आहे.
Dr Ravindra L Kulkarni MD DNB FSCAI Cardiology Just For Hearts