Nutrition
गहू म्हणजे फक्त चपाती? तुमच्या आहारातील लपलेले गव्हाचे प्रकार
गहू म्हणजे फक्त चपाती?
गहू म्हणजे फक्त चपाती, पोळी किंवा पराठा असं आपण समजतो. पण खरं तर गहू आपल्या आहारात खूप ठिकाणी लपलेला असतो आणि आपण तो रोज नकळत खातो.
तुमच्या रोजच्या जेवणात आणि नाश्त्यात गहू कुठे लपलेला असतो ते पाहा: 1. सकाळचा टोस्ट किंवा सॅंडविच ब्रेड: पांढरा, ब्राउन, मल्टीग्रेन—सगळे गव्हावर आधारित. 2. चहा–बिस्किटे: ग्लुकोज बिस्किट असो किंवा कुकीज, प्रामुख्याने मैदा/गहूचं. 3. पास्ता, नूडल्स, मॅगी: मुख्यतः रिफाइंड गहू. 4. केक, पेस्ट्री, पिझ्झा: सगळ्यांचा पाया मैदा. 5. भेळ, चाट, नमकीन: सेव, पापडी, पुरी—सर्व गव्हाचे. 6. बर्गर, रोल्स, पॅटीज: बन आणि कव्हर गहू/मैद्याचे. 7. सूप आणि सॉस: घट्टपणा आणण्यासाठी गव्हाचं पीठ वापरलं जातं. 8. घरगुती स्नॅक्स: चकली, मठरी, खारे बिस्किट, बऱ्याच वेळा गव्हाच्या पिठातूनच.
म्हणून लक्षात ठेवा, जर तुम्ही गहू कमी किंवा बंद करण्याचा विचार करत असाल तर फक्त पोळी बंद करणं पुरेसं नाही. तुमच्या प्लेटमधल्या या “लपलेल्या” गहू स्रोतांकडेही लक्ष दिलं पाहिजे, तेव्हाच खरा बदल होईल.
तुम्ही अजून कोणते गव्हाचे पदार्थ रोज खात असता? कमेंटमध्ये लिहा, तुमचं निरीक्षण कुणाचं तरी डोळे उघडू शकतं!
डॉ. रवींद्र एल कुलकर्णी MD DNB FSCAI Cardiology Just For Hearts