Nutrition
सकाळचा Breakfast खरंच गरजेचा आहे का?
सकाळचा Breakfast खरंच गरजेचा आहे का?
कोणी म्हणतात आवश्यक, तर कोणी म्हणतात नको – मग खरं काय?
1. काही लोक म्हणतात ‘breakfast is a scam’ – का? सकाळचा नाश्ता “सगळ्यात महत्त्वाचा” हे ठसवणं मुख्यतः cereal कंपन्यांचं मार्केटिंग होतं. त्यामुळे अनेकांनी हे अंधश्रद्धेसारखं स्वीकारलं – गरज समजून नाही.
2. कोणासाठी नाश्ता आवश्यक? - लवकर उठणारे - डायबिटिक रुग्ण - विद्यार्थी - शारीरिक काम करणारे हे लोक सकाळी balanced नाश्ता आवश्यकच.
3. कोणाला नाश्ता skip करता येतो? - Intermittent fasting करणारे - थोडीफारच activity असलेले पण त्यांनी पाणी, पोषण आणि ऊर्जा यांचा विचार करूनच skip करावा.
4. सगळ्यात मोठी चूक: “काहीतरी खाल्लं म्हणजे नाश्ता!” फक्त चहा-बिस्किट, मिक्स्चर, किंवा पॅकेज्ड पदार्थ – हे आरोग्यदायी नाश्ता नाहीत.
5. योग्य नाश्ता म्हणजे काय? प्रोटीन + फायबर + हेल्दी फॅट – उदा. मूग, अंडी, ताक, थोडं फळ.
6. नाश्ता न केल्याने काय होते? काहींना चक्कर, थकवा, चिडचिड येते – याचा अर्थ त्यांच्या शरीराला नाश्त्याची गरज आहे.
7. Nutritionist चं मत: सकाळचा योग्य नाश्ता दिवसभराच्या metabolism आणि mood ला support करतो.
8. Intermittent fasting योग्य पद्धतीनं केल्यास फायदेशीर – पण तो सगळ्यांना लागू नाही.
9. रुग्ण म्हणून नाही, माणूस म्हणून विचार करा: तुमचं शरीर काय सांगतंय? ऊर्जा कमी वाटते का? पोट भरतंय का? त्यावर निर्णय ठरवा.
10. माझं वैयक्तिक मत: सर्वांनाच नाश्ता गरजेचा नाही. शरीर, दिनचर्या आणि आरोग्याच्या गरजेनुसार निर्णय घ्या. कधी नाश्ता हवा असतो, तर कधी वर्ज्य असतो – दोन्ही योग्य, जर कारण समजलं असेल तर.
“नाश्ता हवाय का नाही, याचं उत्तर तुमच्या शरीरातच आहे – ते ऐका. सवयीपेक्षा शहाणपण महत्त्वाचं!”
Dr Ravindra L Kulkarni Just For Hearts