Just For Hearts

Lifestyle

भिंतीला टेकून आरोग्याकडे वळा!

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

भिंतीला टेकून आरोग्याकडे वळा!

सतत मोबाईल, लॅपटॉप किंवा खुर्चीत वाकून बसणं यात फक्त मानच नव्हे, तर संपूर्ण शरीराची स्थिती (posture) बिघडते!

पण एक सोपा व्यायाम आहे, Wall Slides जो पाठ, खांदे आणि मणक्याचं रिअलाइनमेंट करणारा कमाल उपाय आहे!

👨‍⚕️ हे कोणासाठी उपयुक्त? • सतत लॅपटॉप/कंप्युटरवर बसणारे • पाठदुखी, खांदेदुखी असणारे • जे पोस्चर सुधारू इच्छितात • ऑफिस कर्मचाऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, घरकाम करणाऱ्यांसाठी… सगळ्यांसाठी!

📍कसं कराल? 1. भिंतीपाशी उभे राहा. डोके, पाठ आणि कंबरेचा मागचा भाग भिंतीला टेकवा. 2. दोन्ही हात ‘W’ आकारात वर उचला आणि भिंतीला टेकवा. 3. श्वास घेत घेत हात वर सरकवा, जसं ‘U’ किंवा ‘Y’ सारखा आकार. 4. मग हळूहळू हात परत खाली आणा. 5. हे वर-खाली 10 वेळा करा.

🕒 दिवसातून 2-3 वेळा केल्यास उत्तम!

🎯 फायदे काय? ✔️ खांद्यांची लवचिकता वाढते ✔️ पाठ सरळ राहते ✔️ मणक्याचं नैसर्गिक वळण टिकतं ✔️ पोस्चर सुधारतं ✔️ मोबाईल हॅंगओव्हर दूर होतो 😉

❗कोणी करायला हवं? कोणत्याही वयोगटासाठी हा व्यायाम आहे. पण जर खांद्याला जोराचा त्रास, मणक्याचे गंभीर आजार किंवा अलीकडे झालेली शस्त्रक्रिया असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

✅ तर मग सुरुवात करा, आजच! भिंतीचा आधार घ्या… आणि आरोग्याकडे एक मजबूत पाऊल टाका.

📌 तुम्ही हा व्यायाम करा आणि काय फरक जाणवला यावर प्रतिक्रिया द्या | शेअर करा | अनुभव ऐकायला आवडेल.

Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts

#posture#wall-slides#back-pain#shoulder-pain#exercise#health#mobility#wellness
Share:WhatsAppXFacebook