Just For Hearts

Fitness

पाय भिंतीला टेकवून वर ठेवणे – एक सोपा पण प्रभावी व्यायाम

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

पाय भिंतीला टेकवून वर ठेवणे, ज्याला Viparita Karani असेही म्हणतात, हा एक सोपा पण अनेक फायदे देणारा व्यायाम आहे.

हा व्यायाम काय आहे? - भिंतीजवळ झोपून दोन्ही पाय सरळ वर भिंतीवर टेकवायचे. - संपूर्ण शरीर शिथिल ठेवायचं आणि श्वास नियमित घ्यायचा.

फायदे – मोठे आणि अनेक: 1. पायांमधली सूज आणि थकवा कमी होतो, Blood Circulation सुधारतो. 2. हृदयावरचा ताण कमी होतो – Relaxation साठी उत्तम. 3. पायांचे स्नायू आणि नसांवरचा दाब कमी होतो. 4. Anxiety आणि मानसिक थकवा कमी करण्यास मदत. 5. पाठीच्या खालच्या भागाला विश्रांती मिळते. 6. Varicose Veins, Restless Legs आणि पाय दुखी यासाठी उपयुक्त.

सुरुवातीला किती वेळ करावा? - रोज 5 ते 10 मिनिटे. - शक्य असल्यास 15 मिनिटांपर्यंत वाढवता येते. - झोपण्यापूर्वी किंवा दमल्यावर करणे उत्तम.

न व्यायामाचा खर्च, न उपकरणे, न वेळेचा अडथळा.

आजपासून फक्त 5 मिनिटं करा – आणि तुम्हाला जाणवेल की "उलटी स्थिती हीच खरी विश्रांती!"

अधिक माहिती Q-A स्वरूपात मिळवण्यासाठी आपले प्रश्न विचारा. patients बघून जसा वेळ मिळेल तसे उत्तरे दिली जातील.

Dr Ravindra L Kulkarni Just For Hearts

#legs-up-the-wall#viparita-karani#relaxation#blood-circulation#anxiety#varicose-veins#simple-exercise
Share:WhatsAppXFacebook