Heart Health
Lipid Profile म्हणजे फक्त रिपोर्ट नाही… ती तुमच्या हृदयाची डायरी आहे!
किती वेळा तुम्ही रक्त तपासणी करून रिपोर्ट ड्रॉवरमध्ये ठेवला आहे? आणि किती वेळा त्या जुन्या रिपोर्टकडे पुन्हा बघितलं आहे?
हेच फरक आहे preventive आणि reactive care मध्ये.
1. फक्त एक रिपोर्ट पाहू नका, serial readings पाहा. एका दिवसाचा cholesterol काही सांगत नाही. पण ६ महिन्यांचे, १ वर्षाचे रिपोर्ट तुम्हाला तुमची जीवनशैली किती सुधारते किंवा बिघडते हे दाखवतात. Trend पाहा, number नव्हे.
2. Total Cholesterol महत्त्वाचं आहे, पण ते सगळं नाही. फक्त “number कमी आहे का जास्त” एवढं बघू नका. Ratio समजून घ्या: Total / HDL Ratio: < 4 चांगलं, < 3 आदर्श. LDL / HDL Ratio: < 2 उत्तम. Triglyceride / HDL Ratio: < 3 सुरक्षित.
ही ratios सांगतात तुमच्या शरीरात “good fat” आणि “bad fat” मध्ये संतुलन आहे का नाही.
3. HDL हे तुमचं ‘Heart Protector’ आहे. HDL जितकं जास्त, तितकं हृदयाचं संरक्षण मजबूत. किमान 40 (पुरुष) आणि 50 (स्त्रिया) ठेवा. HDL कमी असेल तर व्यायाम वाढवा, ताण कमी करा.
4. LDL हे तुमचं ‘Block Maker’ आहे. LDL जितकं जास्त, तितका blockage चा धोका वाढतो. Ideal: <100 mg/dl, पण heart patient साठी <70 mg/dl ठेवणं सुरक्षित.
5. Triglycerides तुमचं खाणं आणि साखरेचं आरसे आहेत. कधी sudden वाढ दिसली तर लक्षात घ्या की ते फक्त fat नाही, तर तुमचं metabolic alarm आहे. Ideal: <150 mg/dl, पण trend वर लक्ष ठेवा.
6. Non-HDL Cholesterol हे सोपं गणित आणि प्रभावी संकेत आहे. Total – HDL = Non-HDL ते 130 पेक्षा कमी ठेवा. हा आकडा संपूर्ण risk दाखवतो.
7. Ratio वरून कथा समजा. जर HDL वाढतंय आणि बाकी numbers कमी होतायत, तर तुम्ही योग्य दिशेत आहात. पण HDL घटतंय, Triglyceride वाढतोय, तर lifestyle rethink करायची वेळ आली आहे!
8. Serial readings तुम्हाला trend दाखवतात. Last year vs This year: • Triglyceride – घटलं का वाढलं? • HDL – स्थिर आहे का कमी झालं? • LDL – बदल किती?
9. Tracking करणारे आणि न करणारे यांच्यात फरक प्रचंड आहे. Tracking करणारा रुग्ण prevention मोडमध्ये असतो. न करणारा surprise मोडमध्ये. आणि हृदयाला surprise आवडत नाही.
तुमचे जुने रिपोर्ट काढा, त्यातली कहाणी वाचा, आणि पुढचा रिपोर्ट “Just For Hearts” सोबत ट्रॅक करा. जे दिसतं, ते बदलतं आणि जे बदलतं, ते टिकतं! ❤️
Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts