Mental Wellness
Mindfulness म्हणजे रानटी हत्तीला शिस्त लावण्यासारखं मनाचं प्रशिक्षण
Just For Hearts1 मिनिटांचे वाचन
पूर्वीच्या काळात, एखादा रानटी हत्ती पकडला की त्याच्या पायाला एक मजबूत खांबाला बांधून ठेवायचे. सुरुवातीला तो हत्ती जोरजोरात धडपडायचा, सुटायचा प्रयत्न करायचा, अस्वस्थ व्हायचा. पण काही वेळाने त्याला कळायचं की ‘इथून सुटणं शक्य नाही’… आणि हळूहळू तो शांत व्हायचा.
तेव्हाच खरी ट्रेनिंग सुरू व्हायची, त्याला शिस्त, कला, आज्ञा पाळायला शिकवायचे.
आपलं मनही तसंच आहे, सतत भटकत असतं. पण Mindfulness च्या माध्यमातून जेव्हा आपण त्याला ‘थांबवतो’, ‘इथेच रहा’ असं सांगतो, तेव्हा हळूहळू ते शांत होतं आणि मग आपल्याला त्याचं पूर्ण नियंत्रण मिळू लागतं.
#mindfulness#mental-wellness#mind-training#stress-management