Heart Health
सकाळी चालायला जाणं का असू शकतं हृदयासाठी धोकादायक?
तुम्ही सकाळी उठताच चालायला निघालात आणि अचानक छातीत दुखू लागलं का? अनेक रुग्णांनी असं अनुभवून ICU मध्ये दाखल व्हावं लागलं आहे. हे का होतं? चला समजून घेऊया.
सकाळचा वेळ हृदयासाठी 'High Risk' का असतो? 1. Blood Pressure spike: झोपेत Blood Pressure कमी असतो, पण उठल्यावर अचानक वाढतो ज्यामुळे हृदयावर ताण येतो. 2. Hormonal surge: सकाळी cortisol आणि adrenaline वाढतात, जे Heart Attack चे ट्रिगर ठरू शकतात. 3. Clotting tendency: सकाळी platelets अधिक सक्रिय असतात, ज्यामुळे रक्तात clots होण्याचा धोका वाढतो. 4. Dehydration: झोपेतून उठल्यावर शरीरात पाण्याची कमतरता असते, ज्यामुळे रक्त दाट होते. 5. अनपेक्षित exertion: उठताच चालायला जाणं, तापमान बदल, दम लागणं, Blood Pressure वाढ यामुळे हृदयाला झटका बसू शकतो.
योग्य वेळ आणि काळजी काय घ्यावी? - उठल्यावर 15-20 मिनिटे शांत बसा आणि stretching करा. - पाणी प्यायला विसरू नका. - चालायला जायचं असेल तर 6:30-7:00 नंतर हळूवार सुरुवात करा. - Blood Pressure, Diabetes, हार्ट प्रॉब्लेम्स असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेऊनच exercise plan करा.
तुमचा सकाळचा routine कसा आहे? खाली comment मध्ये नक्की सांगा. तुमचा routine इतरांना प्रेरणा देऊ शकतो किंवा बदलायला मदत करू शकतो.
Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts