Lifestyle
OMAD (One Meal A Day) – नवा Fitness Trend, पण आपली शतकांपासूनची एकभुक्ती परंपरा
OMAD (One Meal A Day) हा नवा Fitness Trend आहे, पण तो खरं तर आपल्या शतकांपासून चालत आलेल्या 'एकभुक्ती' परंपरेवर आधारित आहे, जी श्रावणात पाळली जाते.
1. एक वेळचं जेवण – श्रावणात पाळली जाणारी एकभुक्ती आता जगभर OMAD म्हणून ओळखली जाते.
2. Meal Timing: दुपारी 12 ते 2 वाजता संतुलित थाळी.
3. दिवसभर: पाणी, लिंबूपाणी, herbal tea, बटरमिल्क/ताक.
4. फायदे: insulin resistance कमी होऊ शकतो, inflammation markers सुधारू शकतात, वजन आणि bloating कमी होतात.
5. Side effects: सुरुवातीला थकवा आणि acidity; Low BP किंवा sugar drop tendency असल्यास सावधगिरी बाळगा.
6. कधी थांबवावे: सतत कमजोरी, चक्कर, sugar कमी होणे किंवा अस्वस्थता वाटल्यास लगेच थांबवा. गर्भवती, Lactating mothers, किशोरवयीन आणि गंभीर आजार असलेल्यांनी टाळावे.
7. Diabetes / Heart patients: आपल्या नेहमीच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊनच करा.
8. माझा अनुभव: मी स्वतः गेली 7–8 वर्षं श्रावण महिन्यात ही पद्धत पाळतो आणि त्याचा फायदा होतोय.
9. या श्रावणात 30 दिवसांचा फिटनेस चॅलेंज एकभुक्ती करून बघा – शरीर आणि मन हलकं होईल.
Dr Ravindra L Kulkarni Just For Hearts