Just For Hearts

Lifestyle

Intermittent Fasting सुरू केलं पण दोन दिवसात सोडलं? कारण आणि उपाय

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

खूप लोक Intermittent Fasting (IF) सुरू करतात पण दोन दिवसांतच सोडतात कारण सुरुवात चुकीची असते.

Intermittent Fasting म्हणजे फक्त तास मोजणं नाही, तर शरीराची भूक समजून घेणं आणि flexibility वाढवणं आहे.

फास्टिंगच्या तासांवर लक्ष देण्याऐवजी निरीक्षणापासून सुरुवात करा:

- खरंच कधी भूक लागते? - सकाळी उठल्यावर लगेच खाण्याची गरज आहे का, की फक्त सवय आहे?

हे IF upgrade करण्याचे पहिले पाऊल आहे.

सुरुवातीसाठी प्रॅक्टिकल स्टेप्स: 1. रात्रीचं जेवण 30 मिनिटं लवकर करा. 2. सकाळचं नाश्ता लगेच स्किप करू नका; भूक लक्षात घेऊन थोडं पुढे ढकला. 3. 3 तासांनी खाणं टाळा, खऱ्या भुकेकडे लक्ष द्या. 4. झोप आणि पाण्याचं गणित सांभाळा. 5. IF सुरू करण्याआधी 1–2 आठवडे हे फॉलो करा.

"शरीर ऐका, नियम लावा" हे IF चं खरे तत्वज्ञान आहे.

IF हा एक powerful tool आहे जो Diabetes, PCOS, Obesity, Fatty Liver साठी उपयोगी आहे. पण योग्य flow नसेल तर साइड इफेक्ट्स होऊ शकतात.

Body आणि mind तयार झाल्यावरच fasting upgrade करा.

सुरुवात करा, सराव करा, मगच upgrade करा.

डॉ. रवींद्र एल. कुलकर्णी, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts

#intermittent-fasting#fasting#metabolic-health#diabetes#pcos#obesity#fatty-liver
Share:WhatsAppXFacebook