Weight Management
The Obesity Code डॉ. Jason Fung यांच्याकडून
The Obesity Code डॉ. Jason Fung यांच्याकडून
"Eat Less, Move More" हे पूर्ण उत्तर नाही कारण...
- कमी खाणं म्हणजे वजन कमी होईलच असं नाही. - रोज चाललं तरी पोट कमी होईलच असं नाही. - कॅलरी म्हणजे सगळं नाही, हार्मोन्स, वेळ, साखर, फास्टिंग सगळं महत्त्वाचं आहे!
डॉक्टर म्हणून मला काय पटते:
1. Insulin हा मुख्य सूत्रधार आहे. Weight loss म्हणजे fat loss, आणि ते फक्त insulin कमी केल्यावरच होतं. फक्त कॅलरी कमी करून उपयोग नाही.
2. Intermittent Fasting (IF) हा एक शक्तिशाली tool आहे. शरीराला वेळ दिला तर ते स्वतःच fat burn करतं. फास्टिंग म्हणजे उपास नाही, तर शास्त्र आहे.
3. साखर आणि processed food हे स्थूलतेचं मूळ आहे. साखर insulin वाढवतं आणि fat storage वाढवतं. ‘Low Fat’ नव्हे तर ‘Low Insulin’ हा keyword आहे.
4. “सकाळी उठून खा” ही सवय सर्वांना लागू नाही. Breakfast skipping IF मध्ये scientifically safe आहे. भूक लागल्यावर खा, वेळेवर खाणं बंधनकारक नाही.
5. Hormonal Obesity ही एक वैद्यकीय condition आहे. blame game बंद करा: इच्छा नाही, चालत नाही एवढंच कारण नाही. इथे insulin, cortisol, मेंदूतील reward system कार्यरत असतो.
6. Patient counselling बदलली पाहिजे. “कमी खा” सांगण्यापेक्षा “साखर बंद करा, वेळा सुधारा” असं सांगायला हवं. प्रत्येकाला diet chart नको, सवयी बदलायच्या आहेत.
हे काही फॅड diet चं पुस्तक नाही, तुमचा आरोग्याचा कोर्स आहे.
एकदा वाचा. दुसऱ्यांदा पचवा. आणि तिसऱ्यांदा अमलात आणा.
डॉ. रवींद्र एल. कुलकर्णी, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts