Just For Hearts

General Health

ER मध्ये आलेला एक 15 वर्षांचा मुलगा…

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

ER मध्ये आलेला एक 15 वर्षांचा मुलगा…

गेल्या 1 महिन्यापासून त्याला fever, cough आणि weight loss सुरू होता. गेल्या 2 दिवसांत त्याला shortness of breath लागायला लागला.

घरात सगळ्यांना वाटलं, “काहीतरी साधं असेल.” एक homeopathic सल्ला सुरू होता (कोणत्याही Pathy बद्दल आक्षेप नाही).

पण आजार थांबला नव्हता. तो वाढत होता.

आज तो थेट Emergency Room मध्ये आला.

* Heart Rate: 180 * Oxygen: 60 * तीव्र respiratory distress

आल्यावर अवघ्या 1 तासात त्याला ventilator लागला.

X Ray पाहता Pulmonary Koch’s (TB) व आता त्यात झालेली complications.

आता उपचार सुरू आहेत. पुढचे काही तास फार महत्त्वाचे असतील. तो कसा respond करतो, ते पाहू.

काय चुकले किंवा काय करायला पाहीजे होते?

* 2-3 आठवड्यांपेक्षा जास्त fever किंवा cough म्हणजे थांबायचं कारण नाही. * लहान मुलांमध्ये weight loss हे गंभीर warning sign असू शकते. * “मुलगा तरुण आहे” हे सुरक्षिततेचं प्रमाणपत्र नाही. * एक उपचार सुरू असूनही सुधारणा नसेल, तर second opinion घ्यायलाच हवं. * Pathy बदलणं हा अपमान नाही, तो वेळी घेतलेला निर्णय आहे. * ER मध्ये येण्याआधी निर्णय घेतले असते, तर कदाचित ventilator टाळता आला असता. * आजार वेळेवर ओळखला गेला नाही, तर तो अचानक जीवघेणा होऊ शकतो.

वेळेवर घेतलेला निर्णय घेणे फार महत्वाचे आहे.

Dr Ravindra L Kulkarni MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts

#emergency-medicine#pulmonary-tb#timely-treatment#second-opinion#child-health#respiratory-distress#ventilator#weight-loss
Share:WhatsAppXFacebook