Just For Hearts

Heart Health

खूप आनंद झाला… पण ECG बिघडला!

Just For Hearts2 मिनिटांचे वाचन

"खूप आनंद झाला… पण ECG बिघडला!"

आनंद हा जसा औषध आहे तसाच अति झाला, तर तो ट्रिगरही ठरू शकतो.

एक कार्डिओलॉजिस्ट म्हणून मला सांगावंसं वाटतंय की "अती उत्साह, अती आनंद" सुद्धा हृदयासाठी घातक ठरू शकतो.

सायन्स काय सांगते? - आनंद म्हणजे सकारात्मक स्ट्रेस. - Dopamine आणि Adrenaline यांचा स्फोट होतो. - Blood Pressure वाढतो, Heart Rate वाढतो, आणि ECG बदलतो. - Heart Failure किंवा bypass झालेल्या रुग्णांना हे सहन होत नाही.

"अती हर्षे धोक्याचे काही उदाहरणे": 1. लग्नात नाचताना bypass रुग्णाला अचानक श्वास लागणे आणि ICU मध्ये भरती. 2. Trade मध्ये हृदयाचे ठोके इतके वाढले की fainting spells आले. 3. सरप्राईज पार्टीत ECG वर arrhythmia दिसून emergency झाली. 4. हास्यस्पर्धा पाहताना chest pain आणि ECG बदल. 5. सोनं विकत घेताना ECG बिघडणं. 6. सासूने अचानक कौतुक केलं, दम लागला, सतत घाम आणि ECG abnormal. 7. संध्याकाळी श्रीखंड पुरी खाल्ल्यानंतर रात्री Viagra घेतली आणि पहाटे ICU मध्ये भरती.

मग काय करावं? थोडा आनंद खूप समाधान!

1. आनंद लुटा! पण शरीराच्या सिग्नल्स ओळखा जसे की छातीत धडधड, श्वास लागणे, अस्वस्थता. 2. आधीपासून हृदयविकार असलेले, bypass किंवा angioplasty झालेले, uncontrolled diabetes असलेले रुग्णांनी अतिउत्साह टाळावा. 3. Meditation, deep breathing, आणि light walking याचा उपयोग करा सणासुदीतही. 4. ECG बदल, palpitations किंवा breathlessness दिसल्यास लगेच डॉक्टरांकडे जा. 5. सण साजरे करा, हसा, आनंद घ्या, पण आपल्या क्षमतेनुसार!

माझा अनुभव सांगतोय... Heart attack हा फक्त दु:खातूनच नाही, उत्साहातूनही येतो! म्हणूनच "हृदयाने आनंद घ्या… पण बुद्धीने साजरा करा!"

मिठाई खा, माणसांमध्ये राहा पण तुमच्या हृदयाचीही काळजी घ्या.

Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts

#heart-health#ecg#emotional-stress#cardiology#joy#heart-attack#festive-care
Share:WhatsAppXFacebook