Just For Hearts

Nutrition

तुम्हाला खरंच Multivitamin ची गरज आहे का? कधी आवश्यक आहे ते जाणून घ्या

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

"डॉक्टर, एक तरी Multivitamin द्या!" तुम्ही कधी अशी विनंती केली आहे का?

आजकाल प्रत्येक Prescription मध्ये Multivitamin दिसते. कधी डॉक्टर लिहितात, पण बरेचदा रुग्ण स्वतःहून मागतात.

पण खरंच, सगळ्यांनाच Multivitamin लागतात का? थोडक्यात समजून घेऊया:

1. जर कमतरता असेल (B12, D3 वगैरे) किंवा विशिष्ट आजार असेल तरच Multivitamin गरजेचं आहे.

2. वृद्धापकाळ, अपुरी भूक, चिडचिड, किंवा recovery मध्ये ते उपयोगी ठरू शकतात.

3. फक्त थोडा थकवा किंवा "मूड नाहीये" म्हणून गोळी सुरू करणं योग्य नाही – मूळ कारण शोधा.

4. "पोटभर जेवत नाही, म्हणून गोळी द्या" – हे सगळ्यांना लागू होत नाही. आहार सुधारला की गोळी न लागण्याची शक्यता जास्त.

5. जास्त घेतल्यास काही व्हिटॅमिन्स (A, D, E, K) शरीरात साठतात आणि त्यामुळे अपाय किंवा त्रास होऊ शकतो.

6. एकाच गोळीने सगळ्यांचं काम होत नाही – वय, आहार, आजार, औषधं वेगवेगळी असतात.

7. "शेजाऱ्याने घेतली, त्याला बरे वाटलं" म्हणून आपणही तीच गोळी सुरू करणं टाळा.

8. Multivitamin हे बूस्टर असतात, मुख्य औषध नाहीत. उपचाराची जागा घेऊ शकत नाहीत.

9. दरवेळी "हे तरी चालू ठेवा" म्हणत गोळ्यांची यादी वाढते, पण फायदा काहीच जाणवत नाही.

10. डॉक्टर योग्य कारण असेल तरच Multivitamin लिहितात – नसताना घेणं म्हणजे अनावश्यक गोळी आणि अनावश्यक खर्च.

Multivitamin ही गरज असेल तेव्हाच ‘उपचार’ ठरते. नसताना घेतली तर ती फक्त ‘सवय’ ठरते.

डॉ. रवींद्र एल कुलकर्णी Just For Hearts

#multivitamin#patient-awareness#health-advice#vitamins#nutrition
Share:WhatsAppXFacebook