Just For Hearts

Diabetes

गोळ्या वेळेवर, डाएट काटेकोर असतानाही Blood Sugar कधी वाढते, कधी कमी का होते?

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

एका वृद्ध जोडप्याची भेट झाली. काकू अत्यंत शिस्तबद्ध होत्या, त्यांना Diabetes चा इतिहास होता आणि त्यांनी डाएट काटेकोरपणे पाळली. ना गोड खाणं, ना उगाच खाणं. तरीही त्यांच्या चेहऱ्यावर कायमचा ताण दिसत होता.

थोडं खोलात गेल्यावर समजलं की त्यांना चार मुलं आहेत, सगळी उच्चशिक्षित आणि यशस्वी. पण आई-बाबांसाठी दर तीन महिन्यांनी नवीन घर, नवीन शेजारी, नवीन स्वयंपाकघर...

"डॉक्टर, नव्या जागेची सवय होते, पण तोपर्यंत परत दुसऱ्या घरात जायचं असतं."

जर एखादा मुलगा देशाबाहेर असेल, तर त्या तीन महिन्यांचा मुक्काम वृद्धाश्रमात करावा लागतो.

ही सततची मानसिक अस्थिरता आणि अनिश्चितता—यावर कोणती औषधे काम करणार?

American Diabetes Association चं स्पष्ट मत आहे: Unstable routines आणि chronic stress थेट Blood Sugar नियंत्रण खराब करतात. Cortisol वाढतो, insulin resistance वाढते.

"Emotional आणि social support हा Diabetes च्या काळजीचा महत्त्वाचा भाग आहे."

Diabetes हा फक्त lifestyle disease नाही, तर एक emotional journey आहे.

Blood Sugar फक्त अन्नावर नाही, तर आपल्याला किती 'ओळखीचं' आणि स्थिर आयुष्य मिळतंय यावरही अवलंबून असतो.

म्हणून मी आज सांगतो:

जिथे 'rotation' आहे, तिथे 'stability' नाही. जिथे 'आश्रय' नाही, तिथे औषधे कमी पडतात. जिथे 'मन मोकळं' नाही, तिथे reports चुकतात.

औषध दिलं? वेळ दिला का? मन ऐकलं का? हे फार महत्वाचे आहे.

डॉ. रवींद्र एल. कुलकर्णी, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts

#diabetes#blood-sugar#stress#emotional-support#diabetes-management#elder-care
Share:WhatsAppXFacebook