Just For Hearts

Lifestyle

सगळ्या टेस्ट्स Normal असतानाही पाय का सूजतात?

Just For Hearts1 मिनिटांचे वाचन

अनेक रुग्णांना गोंधळ होतो जेव्हा सगळ्या टेस्ट reports Normal येतात, तरीही पाय सूजतात.

हे लक्षात ठेवा: Normal test reports म्हणजे Health Perfect आहे असे नाही. सूज ही एका मोठ्या यंत्रणेतील असंतुलनाचं लक्षण असू शकते.

रिपोर्ट्स Normal असतानाही सूज का येते?

1. Insulin resistance / Metabolic syndrome: शरीरात साखर नीट वापरली जात नाही, त्यामुळे सूक्ष्म सूज (inflammation) वाढते. 2. पाणी धरून ठेवण्याची प्रवृत्ती: काही लोकांच्या पेशींमध्ये sodium आणि पाणी जास्त साठते. 3. शारीरिक हालचाल कमी: दिवसभर बसून राहिल्यामुळे circulation मंद होते आणि सूज होते. 4. हार्मोनल बदल: स्त्रियांमध्ये PMS किंवा post-menopausal काळात सूज जाणवते. 5. अति मीठ / अर्धवट झोप: sodium retention आणि poor recovery मुळे swelling होते.

काय करावं?

6. Lifestyle सुधारणा: चालणे, मीठ कमी करणे, झोप सुधारण्यास सुरुवात करा. 7. Insulin resistance वर लक्ष द्या: डाएट, व्यायाम, वजन कमी करा. 8. Health अपडेट ठेवा: सूज राहत असल्यास Regular Follow-up करा. 9. त्रास नसेल तरीही सूज दुर्लक्ष करू नका; ती एक “silent alarm” आहे. 10. तपासणी करा कारण बाहेरून काहीच कळत नाही.

रिपोर्ट्स Normal असल्या तरी सूज काहीतरी बिघडत असल्याचं सांगू शकते. शरीराची भाषा वेळेत समजून घेतली तर मोठा त्रास होणार नाही.

Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts

#leg-swelling#insulin-resistance#metabolic-syndrome#lifestyle-changes#health-monitoring#silent-alarm
Share:WhatsAppXFacebook